Israel Hamas War : युद्धाचे चटके! साडेसात हजार बळी; हल्ल्यांनी गाझाची चाळण
Israel Hamas War : इस्त्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यातील युद्ध (Israel Hamas War) अजूनही सुरुच आहे. हमासच्या अतिरेक्यांनी इस्त्रायलमध्ये रॉकेट हल्ले करत युद्धाला सुरुवात करून दिली. त्यानंतर खवळलेल्या इस्त्रायलने सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. या युद्धात संपूर्ण गाझा पट्टी (Gaza) उद्धवस्त झाली आहे. आता इस्त्रायलने येथील पाणी, इंधन, वीज पुरवठा सगळं काही बंद केले आहे.या युद्धात इस्त्रायली नागरिक आणि पॅलेस्टिनी यांच्यासह अनेक विदेशी नागरिकांचा या युद्धात बळी गेला आहे. आतापर्यंत युद्धात 7650 नागरिकांचा बळी गेला आहे. तर या संघर्षात 19 हजार 450 लोक जखमी झाले आहेत. आता कालपासून इस्त्रायलने गाझा शहरात जमिनीवरून हल्ले सुरू केले आहेत. त्यामुळे युद्ध अधिकच भडकले आहे.
कझाकस्तानमध्ये पोलाद खाणीला आग; 32 जणांचा मृत्यू, बेपत्ता लोकांचा शोध सुरु
इस्त्रायली लष्कराचे रिअर अॅडमिरल डॅनियल हगरी यांनी सांगितले, की गाझावर जमिनीवरून हल्ले करण्यात येत असून त्यात कुठेही खंड पडलेला नाही. गाझात रणगाडे शिरल्याचा व्हिडिओ काल जारी करण्यात आला. गाझातील भुयारे, बंकर नष्ट करण्यासाठी इस्त्रायल बॉम्बहल्ले करत आहे. उत्तर भागात हमासने बांधलेली 150 भुयारे व बंकर नष्ट केल्याचा दावा इस्त्रायलने केला आहे. शनिवारी दिवसभर गाझा पट्टीवर हल्ले सुरुच राहिले. पॅलेस्टाइनच्या पाल्टेल समुहाने इस्त्रायलच्या बॉम्बहल्ल्यात इंटरनेट आणि दूरध्वनी सेवा पूर्ण बंद झाल्याचे सांगितले. ही सेवा बंद झाल्यामुळे किती मृत्यू झाले आहेत आणि जखमी किती आहेत याचा निश्चित आकजा समजू शकणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
भारताचं कॅनडाला समर्थन
इस्त्रायल हमास यांच्यातील यु्द्ध (Israel Hamas War) अजूनही संपलेलं नाही. या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्राने जनरल असेब्लीच्या विशेष सत्रामध्ये शुक्रवारी इस्त्रायलकडून गाझापट्टीवर होणारे प्रतिहल्ले तात्काळ थांबवण्याची मागणी करण्यात आली. या प्रस्तावाला दोन तृतीयांश मत मिळाली आणि तो पारित करण्यात आला. दुसरीकडे या प्रस्तावाला 120 मतदान झालं ज्यामध्ये 14 मत या प्रस्तावाच्या विरोधात होती. तर 45 देशांची या सभेला हजेरी नव्हती त्यात भारत देखील होता. दरम्यान भारत या सभेला हजर नव्हता याचं कारण सांगण्यात येत आहे की, या प्रस्तामामध्ये हमासने इस्त्रायलवर केलेल्या दहशतवादी हल्ल्याचा कोणताही उल्लेख नव्हता. तर ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जर्मनी, जपान, युक्रेन आणि इंग्लंड हे देश देखील भारताप्रमाणे या मतदानासाठी गैर हजर होते.
Israel Hamas War : भारताचं मोठं पाऊलं; इस्त्रायल-हमास युद्धविराम नाकारत कॅनडाला दिलं समर्थन
दरम्यान संबंध ताणलेले असतानाही भारचताने कॅनडाच्या या प्रस्तावाला पाठिंबा दिला. कारण इस्त्रायलींना बंदी बनवण्यात आलं आहे. त्यांच्याप्रति असलेल्या संवेदना तसेच दहशतवादाची कोणतीही सीमा नसते. राष्ट्रयत्व नसतं. त्यामुळे त्याचा विरोधच केला पाहिजे. तसाच प्रस्ताव क्रनडाचा होता. म्हणूनच भारताने संबंध ताणलेले असतानाही भारचताने कॅनडाच्या या प्रस्तावाला पाठिंबा दिला. असं सांगण्यात येत आहे.