Download App

इस्त्रायलचा बदला! चोवीस तासांच्या आत दोन कट्टर शत्रूंचा खात्मा; कारवाईने खळबळ

इस्त्रायलने आपल्या दोन मोठ्या शत्रूंचा चोवीस (Israel Hamas War) तासांतच खात्मा केला आहे.

Israel Hamas War : इस्त्रायलने आपल्या दोन मोठ्या शत्रूंचा चोवीस (Israel Hamas War) तासांतच खात्मा केला आहे. बेरुतमध्ये फऊद शुकर आणि इराणची राजधानी तेहरानमध्ये (Iran) इस्माइल हनियाची हत्या झाली (Ismail Haniyeh) आहे. शुकरच्या मृत्यूची जबाबदारी इस्त्रायली सैन्याने घेतली (Israel Attack) आहे. आता हनियाच्या मृत्यूलाही इस्त्रायलच जबाबदार असल्याचे सांगितले जात आहे. इस्त्रायलने मात्र यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. इराणी मीडियाने मात्र हनियाचा मृत्यूचा दोष इस्त्रायलवर ठेवला आहे.

हमास प्रमुख इस्माइल हनिया मारला (Hamas) गेला आहे. इराणच्या इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) हनियाच्या मृत्यूच्या घटनेला दुजोरा दिला आहे. आयआरजीसीने एक निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. तेहरानमध्ये हनियाच्या (Tehran) घरावर हल्ला झाला असून त्यात हमास प्रमुख इस्माइल हनियाचा मृत्यू झाला तसेत त्यांच्या सुरक्षारक्षकाचीही हत्या करण्यात आल्याचे या निवेदनात म्हटले आहे. येथे झालेल्या स्फोटात हनियाचा मृत्यू झाला. या प्रकरणात इस्त्रायलने अजून कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही.

मोठी बातमी! इस्त्रायलच्या कारवाईत हमास प्रमुखाचा मृत्यू; इराणमध्ये घुसून मारले

हनियाला कुणी मारलं?

आयआरजीसीच्या संपर्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी झालेल्या या हल्ल्याचा तपास केला जात आहे. हनिया बरोबरच त्याच्या सुरक्षारक्षकालाही ठार मारण्यात आले आहे. हनिया मंगळवारी इराणचे राष्ट्रपतींच्या शपथविधी सोहळ्यात उपस्थित होता. यानंतर इराणच्या सर्वोच्च नेत्याचीही भेट त्याने घेतली होती.

कोण होता इस्माइल हनिया?

इस्माइल हनिया हा एक पॅलेस्टिनी नेता होता. सन 1962 मध्ये गाझा पट्टीतील एका शरणार्थी शिबिरात त्याचा जन्म झाला होता. हमास संघटनेचा प्रमुख बनल्यानंतर सन 2019 मध्ये हनियाने गाझा सोडले होते. हमासची लीडरशीप मिळाल्यानंतर हनियाचा प्रभाव वाढला होता. त्याच्या देखरेखीत मागील वर्षी 7 ऑक्टोबर रोजी इस्त्रायलवर मिसाइलने हल्ले करण्यात आले होते. हनियाच्या मृत्यूची जबाबदारी अजून कोणीही घेतलेली नाही. तरी देखील इराणी मीडिया मात्र इस्त्रायलला जबाबदार धरत आहे.

हमासमध्ये सहभाग कधी

इस्माइल हनिया सन 1987 मध्ये हमास संघटनेत सहभागी झाला होता. सन 2017 पासून हनिया या संघटनेचा चीफ पॉलिटिकल लीडर बनला होता. हमासमध्ये निर्णय घेणारी सर्वात मोठी समिती शूरा परिषदेने 2021 मध्ये हनियाला आणखी चार वर्षांसाठी नियुक्ती मिळाली होती. संघटनेत हनियाचा प्रभाव इतका जास्त होता की त्याला आव्हान देणारा दुसरा कोणताच नेता येथे नव्हता. यामुळेच हनियाची बिनविरोध निवड झाली होती. हमासचा प्रमुख असल्याने इस्त्रायल हनियाला आपला कट्टर शत्रू मानत होता. आता त्याचा खात्मा झाला आहे. याआधी हिजबुल्ला संघटनेचा टॉप कमांडर फुआद शूकर यालाही इस्त्रायलने ठार मारले.

इस्त्रायल हमास युद्ध थांबणार? इस्त्रायलच्या ‘त्या’ प्रस्तावाची अमेरिकेने केली घोषणा

follow us