Download App

Israel Hamas War : बंदिस्तांच्या सुटकेसाठी इस्त्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाबाहेर निदर्शने…

Israel Hamas War : इस्त्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यातील युद्धामध्ये (Israel Hamas War) हमासच्या अतिरेक्यांच्या रॉकेट हल्ल्यांनंतर खवळलेल्या इस्त्रायलने सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. या युद्धात संपूर्ण गाझा पट्टी (Gaza) उद्धवस्त झाली आहे. त्यामुळे आता जगभरातील देश पॅलेस्टाइनला मदत करत असताना भारताने देखील पॅलेस्टाइनला मदतीचा हात दिला आहे. मात्र, दुसरीकडे इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धाचे पडसाद उमटत आहेत. पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने पकडलेल्या इस्रायली बंदिस्तांच्या सुटकेच्या मागणीसाठी जेरुसलेममधील इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या कार्यालयाबाहेर हजारो लोकांनी निदर्शने केली आहेत. बंदिस्तांचे कुटुंबीय या निषेध मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी गरज पडल्यास गाझाकडे कूच करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्याल तर सरकारला सत्तेतून खेचू; प्रकाश शेंडगेंचा इशारा

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जवळपास 30 हजार लोकं या आंदोलनात सामील झाले असून आंदोलकांनी पंतप्रधान कार्यालयाकडे मोर्चा वळवला होता. आंदोलकांकडून इस्रायल सरकारने बंदिस्तांना तात्काळ सुटका करण्याची मागणी केली.

कोकण रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, ‘या’ तारखेपूर्वी करा अर्ज, जाणून घ्या कोण करू शकतं अर्ज?

आम्ही पाच दिवसांपासून न थांबता चालत आहोत आणि माझे पाय दुखत आहेत आणि माझे संपूर्ण शरीर दुखत आहे, परंतु माझ्या मुलासाठी माझे हृदय कितीतरी पटीने जास्त दुखत आहे. आम्हाला गाझाकडे कूच करायची असेल तर आम्ही पायी कूच करू, आमच्या मुलांच्या सुटकेसाठी आम्हाला जिथे जावे लागेल तिथे जाऊ. आम्ही त्यांना एकटे सोडणार नसल्याचं बंदिस्ताने प्रतिक्रिया दिली आहे.

जरांगेच्या सभेला शाहू महाराज, संभाजीराजेंची हजेरी; लोकांचे रक्त पिऊन श्रीमंत..; शाहू महाराजांसमोरच भुजबळांचा समाचार

तेल अवीवमधून या मोर्चाला सुरुवात झाली असून मोर्चा जेरुसलेममध्ये पोहोचल्यानंतर पंतप्रधान नेतन्याहू म्हणाले, मी देखील बंदिस्तांच्या सुटकेसाठी मार्च करत आहेत. बंदिस्तांना सोडण्यासाठी इस्रायली जनतेचा नेतान्याहू सरकारवर दबाव वाढत आहे.

Box Office Collection: भाईजानच्या ‘टायगर 3’च्या कमाईमध्ये मोठी घसरण; पाचव्या किती कोटी कमावले?

बंदिस्तांची सुटका करण्यासाठी इस्रायली सरकार चर्चा करत आहे की नाही, त्यांना याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. अलीकडेच राजनैतिक सूत्रांनी सांगितले होते की, पॅलेस्टिनी कैद्यांच्या बदल्यात इस्रायलकडून काही बंदिस्तांची सुटकेसाठी चर्चा सुरू आहे. मात्र या चर्चेचा अद्याप कोणताही परिणाम झालेला नाही. बंदिस्तांच्या सुटसंदर्भात काय चर्चा होत आहे हे माहित नसल्याचं बंदिस्तांच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे.

Tags

follow us