Download App

राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून बायडन घेणार माघार; भारतीय वंशाच्या कमला हॅरिस उमेदवार असणार?

अमेरिकेत सध्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीचं वार वाहत आहे. प्रचार शिगेला पोहचला आहे. अशातच आता विद्यमान अध्यक्ष माघार घेण्याची बातमी आहे.

  • Written By: Last Updated:

US Election 2024 : सध्या अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक सुरुय. (US Election) या निवडणुकीतून विद्यमान राष्ट्राध्यक्ष आणि डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन हे माघार घेणार असल्याचं आता जवळपास निश्चित झालं आहे. माघार घेतल्याची घोषणा अद्याप अधिकृतरित्या झालेली नाही. (Joe Biden) मात्र, त्यांनी यासाठी सहमती दर्शवली आहे. पत्रकार आणि न्यूजमॅक्स समालोचक मार्क हॅल्पेरिन यांनी गुरुवारी सूत्रांच्या हवाल्यानं याबाबत वृत्त दिलं होतं.

अधिकृत नामांकन   माणसाच्या महत्त्वाकांक्षा कधीच संपत नाहीत; भगवानही बनू पाहतो, मोहन भागवतांचा रोख कुणाकडं?

जो बायडन 81 वर्षांचे आहेत. ते या आठवड्याच्या शेवटी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतून माघार घेऊ शकतात. पण सध्या त्यांच्या मंत्रिमंडळातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक पावरफुल नेत्या आणि उपाध्यक्ष भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांचं आपण आपल्याजागी राष्ट्राध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून समर्थन करणार नाही, असंही बायडन यांनी म्हटल्याचं न्यूजमॅक्सच्या हॅलपेरिन यांनी आपल्या सुत्रांच्या हवाल्यानं सांगितलं आहे. पण हॅऱिस यांची इच्छा असल्यास त्यांना पुढील महिन्यात डेमोक्रॅटिक पक्षाच्या अधिकृत नामांकनासाठी खुल्या अधिवेशनाला सामोरे जावं लागणार आहे.

गोळीबाराची घटना 

अमेरिकेत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर अनेक माध्यमांनी बायडन शनिवार किंवा रविवार निवडणुकीतून माघार घेतील अशी अपेक्षा व्यक्त केली होती. दरम्यान, बायडन किंवा त्यांच्या टीमनं अद्याप या वृत्तावर प्रतिक्रिया दिलेली नाही. तसंच, माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर या निवडणुकीला वेगळच वळण लागलं आहे.

सामान्य लक्षण ऐन निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना कोरोना; पोस्ट करत म्हणाले मी पुन्हा येईन

नुकतीच बायडन यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना श्वासोच्छवासासंबंधी त्रासाची सौम्य लक्षणे जाणवत आहेत असं राष्ट्राध्यक्षांच्या डॉक्टरांनी सांगितलं आहे. डॉ. केविन ओ’कॉनर यांनी एका निवेदनात म्हटलं आहे की, बायडन यांच्या अंगात ताप नाही आणि त्याच्यात कोविडची लक्षण दिसतं असली तरी ती सामान्य आहेत. त्यांच्यावर पॅक्सलोव्हिड या औषधाद्वारे उपचार सुरू आहेत.

follow us