Download App

पाकिस्तान सरकारला देशातच आव्हान, ‘या’ राज्याने आदेश मानलाच नाही; काय घडलं?

खैबर पख्तूख्वा प्रांताने संघीय सरकारची निर्वासन निती दोषपूर्ण आहे असे स्पष्ट करत कोणत्याही अफगाण शरणार्थीला जबरदस्तीने बाहेर काढले जाणार नाही

Afghan Refugees in Pakistan : पाकिस्तानात सध्या मोठी उलथापालथ सुरू आहे. येथील प्रांतीय (Afghan Refugees in Pakistan) सरकारही आता केंद्र सरकारच्या आदेशाचे पालन करण्यास तयार नाहीत. अफगाण निर्वासितांच्या मुद्द्यांवर दोन्ही सरकारांत तणाव वाढला आहे. खैबर पख्तूख्वा प्रांताने संघीय सरकारची निर्वासन निती दोषपूर्ण आहे असे स्पष्ट करत कोणत्याही अफगाण शरणार्थीला जबरदस्तीने बाहेर काढले जाणार नाही अशी घोषणाच केली.

देशातील अन्य राज्यांतून अफगाण निर्वासितांना बाहेर काढण्याची मोहीम सुरू झाली आहे. परंतु, खैबर पख्तूनख्वा सरकारमे उलट निर्णय घेतल्याने वादाला सुरुवात झाली आहे. स्थानीय मीडिया रिपोर्ट्सनुसार पाकिस्तानने अफगाण नागरिक कार्डधारक (ACC) शरणार्थींना पुन्हा त्यांच्या देशात जाण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदत दिली होती. या मुदतीत जे लोक पाकिस्तान सोडून त्यांच्या देशात जाणार नाहीत अशा लोकांना जबरदस्तीने बाहेर काढण्यात येईल असा इशारा पाकिस्तान सरकारने दिला होता.

अमेरिकेत पाकिस्तानींना नो एन्ट्री? पाकिस्तानातही अफगाणी लोकांना अल्टीमेटम; काय घडलं?

खैबर पख्तूनख्वा प्रांतात इमरान खान यांच्या पाकिस्तान तहरीक ए इंसाफ पक्षाचे सरकार आहे. या प्रांताच्या मुख्यमंत्र्‍यांनी शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आम्ही कुणावरही दबाव टाकणार नाही. पण जर कुणाला स्वेच्छेने त्यांच्या देशात परत जायचे असेल तर त्यांच्यासाठी आम्ही व्यवस्था करू. अफगाण शरणार्थीं संदर्भात पाकिस्तानच्या संघीय सरकारचे धोरण दोषपूर्ण आहे असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

दुसरीकडे पाकिस्तान सरकारने देशभरातील अफगाण शरणार्थी लोकांना पकडून त्यांना त्यांच्या देशात रवाना करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. पाकिस्तानातील प्रमुख वृत्तपत्र द एक्सप्रेस ट्रिब्यूननुसार कराचीत नगर प्रशासन आणि कायदा प्रवर्तन एजन्सींनी शुक्रवारी जवळपास 16 हजार 138 अफगाण नागरिक कार्डधारकांना अफगाणिस्तानात पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. 150 जास्त अफगाण लोकांना ताब्यात घेतले आहे.

श्रीलंका, नेपाळ अन् पाकिस्तान चीनच्या सापळ्यात मित्र देश कंगाल; आता ‘हा’ देश चीनच्या रडारवर..

follow us