Mansa Musa Region Gold Flood Drowned Egypt Economy : सोनं (Gold Flood) पुन्हा कडाडलं आहे. नुकतंच 95 हजारांचा टप्पा सोन्याने पार केलाय. आजकाल सोन्याच्या किमतीत मोठी वाढ दिसून येत आहे. त्यामुळे प्रत्येकजण असा विचार करतोय, की माझ्याकडं थोडं सोनं असतं तर किती बरं झालं असतं. पण तुम्हाला माहित आहे का? जास्त सोन्यामुळे एका देशाची अर्थव्यवस्थाच (Egypt Economy) कोलमडली होती. आपण इतिहासातील अशाच एका घटनेसंदर्भात सविस्तर जाणून घेऊ या.
जागतिक बाजारपेठेतील तणावपूर्ण वातावरण आहे. सोन्याच्या किमतीत मोठी वाढ दिसून येत आहे. येत्या काळात 10 ग्रॅम सोन्याची किंमत 1 लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकते, असा अंदाज आहे. अशा परिस्थितीत, जर एखाद्याकडे 1 तोळा किंवा 2 तोळा सोने (Gold Investment) असेल, तर… पण तुम्हाला माहिती आहे का? इतिहासात अशी एक घटना घडली होती. जेव्हा एका देशाची अर्थव्यवस्था त्याच्या प्रचंड सोन्याच्या साठ्यामुळे कोलमडली होती. ती अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येण्यासाठी तब्बल 12 वर्षे लागली होती.
सोन्याने पहिल्यांदाच 95 हजारांचा टप्पा ओलांडला; खरेदी,विक्री की होल्ड करायचं? तज्ज्ञांचा सल्ला काय?
ही घटना 1324 सालची आहे. जेव्हा सोन्यामुळे इजिप्तची अर्थव्यवस्था डळमळीत होती. माली साम्राज्याचा 9 वा शासक मनसा मुसा होता. मुसाकडे त्यावेळी भरपूर संपत्ती होती. तो 1324 मध्ये त्याचे 60 हजार नागरिक, 12 हजार गुलाम, 500 घोडे अन् 80 उंटांसह प्रवासाला निघाला होता. त्याच्यासोबत असलेले घोडे आणि उंट सोन्याने लादलेले होते. जेव्हा तो इजिप्तची राजधानी कैरो येथे पोहोचला, तेव्हा त्याने कैरोच्या लोकांना उदार हस्ते सोने वाटले. श्रीमंत-गरीब प्रत्येकाच्या हातात सोने होते.
अहिल्यानगरच्या रेल्वेस्थानकासाठी 31 कोटींचा निधी, खासदार नीलेश लंके यांची माहिती
परंतु याच सोन्याच्या महापुरामुळे तिथली अर्थव्यवस्था बुडाली. लोकांकडे सोने होते, पण खरेदी करण्यासाठी वस्तू नव्हत्या. कैरोमध्ये महागाई गगनाला भिडली. देश मंदीत गेला, यातून सावरण्यासाठी १२ वर्षे लागली. जगातील अर्धे सोने मालीमध्ये होते. ब्रिटिश संग्रहालयाच्या मते, त्यावेळी मालीमध्ये जगातील अर्धे सोने होते. मनसा मुसाने टिंबक्टूला एक नवा रंग दिला. त्यांची संपत्ती इतकी होती की, आज त्याचा योग्य अंदाज लावणे कठीण आहे. 1375 च्या कॅटलान अॅटलासमध्ये मालीचे वर्चस्व स्पष्टपणे दिसून येते. यामध्ये मनसा मुसा सिंहासनावर दाखवला आहे. त्याच्या एका हातात सोन्याचा गोळा आणि दुसऱ्या हातात सोन्याची काठी आहे. मुसाने 25 वर्षे मालीवर राज्य केलं होतं. इतिहासकार म्हणतात की, त्याच्या संपत्तीचा अंदाज नाही.
आज देखील सोन्याच्या किमतीत वेगाने वाढ होत आहे. त्यामुळे अनेकांना वाटतंय की, माझ्याकडे देखील थोडंसं सोनं असतं तर मी किती श्रीमंत असतो. परंतु कदाचित सोन्याच्या किमतीत होणारी वाढ धोकादायक ठरू शकते. याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर देखील होऊ शकतो.