मोठ्या अपघातातून पोटचा गोळा सुखरूप बाहेर आला अन् उपमुख्यमंत्र्यांच्या बायकोनं नवस फेडला; वाचा काय घडलं?

  • Written By: Published:
मोठ्या अपघातातून पोटचा गोळा सुखरूप बाहेर आला अन् उपमुख्यमंत्र्यांच्या बायकोनं नवस फेडला; वाचा काय घडलं?

Actor and Andhra Pradesh Deputy Chief Minister Pawan Kalyan’s wife Anna Lezhneva offers hair at Tirumala : प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण (Pawan Kalyan) हे विविध कारणांमुळे नेहमची चर्चेत असतात. मात्र, यावेळी पवन कल्याण हे स्वतः नव्हे तर, त्यांची रशियन पत्नी अन्ना लेझनेवा सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होणाऱ्या फोटोंमुळे चर्चेत आहेत. असं नेमकं असं काय घडलं आणि अन्ना लेझनेवा चर्चेत आल्या अन् त्यांच्या कृतीची चर्चा होऊ लागली हेच आपण जाणून घेऊया….

पवन कल्याण राजकारणतही ठरले; सुपरस्टार महाराष्ट्रात ज्यांच्यासाठी सभा घेतली त्यांना लागला गुलाल

आपल्यापैकी अनेक जण तिरूमला मंदिराला (Tirupati Balaji Temple) भेट देत असतात. काहीजण तेथे केसही दान करतात हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. असेच पवन कल्याण यांच्या पत्नी लेझनेवा यांचे तिरूपती येथे केशार्पण करतानाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. लेझनेवा यांनी बालाजीचे दर्शन घेतल्याने केशार्पण केले असेल असे तुम्हाला वाटेल पण, हे या मागचे कारण नाहीये. तर, पवन कल्याण आणि अन्ना लेझनेवा यांचा धाकटा मुलगा घडलेल्या अपघातातून सुखरूप बाहेर यावा यासाठी बोललेला नवस पूर्ण झाल्याने लेझनेवा यांनी केशार्पण केल्याचे सांगितले जात आहे. केशार्पण करतानाचे काही फोटो जनसेना पार्टीच्या एक्स हँडलवरून पोस्ट करण्यात आले आहे.

पवन कल्याण यांच्या धाकट्या मुलाला नेमकं काय झालं होतं?

पवन कल्याण आणि अन्ना लेझनेवा यांचा धाकटा मुलगा मार्क शंकर हा सिंगापूरमध्ये आयोजित एका शाळेत समर कॅम्पमध्ये सहभागी झाला होता. ज्यावेळी अचानक 8 एप्रिल रोजी शाळेत आग लागली. यात मार्क शंकर याच्या हाताला आणि पायाला भाजले होते. त्यावेळी अन्ना लेझनेवा यांनी मार्क सुखरूप बरा व्हावा यासाठी देवाकडे नवस बोलला होता.

पवन कल्याण जिंकले, नेत्यानं स्वतःचं नावच बदललं; निवडणुकीत शब्द दिला तो खराच केला

उपचारांनंतर मार्क सुखरूप

दरम्यान शाळेत लागलेल्या आगीत मार्कच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आता मार्क शंकर पूर्णपणे सुखरूप बरा झाला असून, लेझनेवा यांनी देवाकडे केलेला नवसही पूर्ण झाला आहे. आपला मुलगा सुखरूपपणे बरा झाल्याने लेझनेवा यांनी तिरूपती बालाजी येथे दर्शन घेत केशार्पण केले.

अन्ना लेझनेवा एक रशिय मॉडेल

आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या पत्नी अन्ना लेझनेवा या एक रशियन मॉडेल आणि अभिनेत्री आहेत. त्यांचा जन्म १९८० मध्ये रशियामध्ये झाला असून, त्यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात मॉडेलिंगने केली. नंतर त्यांनी काही दक्षिण भारतीय चित्रपटांमध्येही काम केले.

घरमालकांना मोठा दिलासा! आयटीएटीच्या नियमांनुसार पुनर्विकसित फ्लॅट्स ‘इतर उत्पन्न’ म्हणून करपात्र नाही

कशी झाली पवन कल्याण अन् लेझनेवा यांची भेट

अन्ना लेझनेवा आणि पवन कल्याण यांची पहिली भेट एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान झाली होती. दोघांनी ‘तीन मार’ चित्रपटात एकत्र काम केले होते आणि येथूनच या दोघांमध्ये प्रेमाचे नाते सुरू झाले. यानंतर दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. २०१३ मध्ये पवन कल्याण आणि लेझनेवा यांचे लग्न झाले. पवन कल्याण यांचे हे तिसरे तर, लेझनेवा यांचे हे दुसरे लग्न आहे. पवन यांचे पहिले लग्न १९९७ मध्ये नंदिनी यांच्याशी झाले होते, परंतु ते २००१ मध्ये दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. नंदिनी यांच्यापासून पवन यांना दोन मुले असून, त्यानंतर २००९ मध्ये पवन कल्याण यांनी रेणू देसाई यांच्याशी दुसरे लग्न केले. मात्र, २०१२ मध्ये नंदिनी आणि पवन कल्याण विभक्त झाल्यानंतर २०११ मध्ये अन्ना लेझनेवा यांची पवन कल्याण यांच्या आयुष्यात एन्ट्री झाली.

अन्ना लेझनेवा यांना पहिल्या पतीपासून अंजना पावनोवा ही एक मुलगी असून, पवन कल्याण यांच्यासोबतच्या लग्नानंतर या जोडप्याला मार्क शंकर हा मुलगा झाला. याच लाडक्या लेकाला झालेल्या गंभीर दुखापतीनंतर तो सुखरूप बरा व्हावा यासाठी अन्ना लेझनेवा यांनी देवाकडे नवस बोलला होता. जो आता पूर्ण झाला असून, त्याचाच एक भाग म्हणून लेझनेवा यांना तिरूपती बालाजी येथे केशार्पण केल्याचे सांगितले जात आहे.
अन्ना लेझनेवा यांचे सोशल मीडियावर व्हायरल होणारे फोटो पाहून प्रत्येक आईला आपलं लेकरू सुखरूप रहावं असेच वाटतं असते मग, ती आई भारतीय असो वा परदेशी याच भावना लेझनेवा यांच्या व्हायरल होणाऱ्या फोटोंनंतर प्रत्येकाच्या मनात आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube