Israel and Hamas war : इस्रायल आणि हमास (Israel and Hamas war) यांच्यातील युद्ध सुरू होऊन 40 दिवसांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. या युद्धात अनेक निष्पाप नागरिकांचा बळी जात आहे. त्यामुळे युद्धविराम कधी होणार? याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. काही दिवसांपासून हमासने ओलीस ठेवलेल्या लोकांच्या सुटकेसाठी दोन्ही बाजूंमध्ये चर्चा सुरू होती. दरम्यान, इस्रायलच्या मंत्रिमंडळाने (Israel Cabinet) अखेर प्रस्तावाला मंजूर दिली. त्यानुसार पुढील चार ते पाच दिवस युद्धविराम राहणार आहे. त्या बदल्यात हमास ओलिसांची सुटका करेल.
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे डीजीसीए तडकाफडकी निलंबित, जाणून घ्या काय आहे प्रकरण
इस्रायलमध्ये मंगळवारी रात्री स्थानिक वेळेनुसार रात्री आठ वाजता इस्रायलच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत हमाससोबतच्या कराराला मान्यता देण्यात आली आहे. एएफपी या वृत्तसंस्थेने या बैठकीबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे. टाईम्स ऑफ इस्रायलने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, येत्या चार ते पाच दिवसांत हमास 50 इस्रायली नागरिकांची सुटका करेल, ज्यामध्ये 30 हून अधिक मुले आणि त्यांच्या मातांचा समावेश आहे. इस्रायली माध्यमांच्या मते, हा करार केवळ लहान मुले आणि महिला ओलिस यांच्याशी संबंधित आहे.
या करारानुसार, हमास 50 इस्रायली ओलिसांची सुटका करेल त्या बदल्यात इस्रायल तिप्पट रक्कम म्हणजेच 150 पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करेल.
Operation Silkyara : बचावकार्याने वेग धरला; मजुरांच्या सुटकेसाठी NDRF जवानांचा बोगद्यात प्रवेश
पीएमओच्या निवेदनात म्हटले आहे की गाझामध्ये ओलिस ठेवलेल्या 50 महिला आणि मुलांची चार दिवसांत सुटका केली जाईल, या दरम्यान लढाई थांबविली जाईल. सोडलेल्या प्रत्येक अतिरिक्त 10 ओलिसांसाठी, युध्द विराम आणखी एक दिवस वाढवला जाईल. गुरुवारी सकाळी लवकरात लवकर देवाणघेवाण होऊ शकते असा अंदाज स्थानिक माध्यमांनी व्यक्त केला.
इस्रायलने 300 पॅलेस्टिनींची यादी जाहीर केली
इस्रायल आणि हमास यांच्यातील करारानुसार सुटका होऊ शकणार्या 300 पॅलेस्टिनींची यादी इस्रायलने जारी केली आहे. इस्त्रायली न्याय मंत्रालयाच्या वेबसाइटवर पोस्ट केलेल्या यादीमध्ये नाव, वय आणि त्यांच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. सुरुवातीला केवळ 150 कैद्यांची सुटका होण्याची शक्यता आहे. या करारामागे इजिप्त, अमेरिका आणि कतार यांचा हात असल्याचे समजते.
4 दिवसांच्या युद्धविराम दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले, ‘आम्ही युद्धात आहोत आणि आमचे सर्व लक्ष्य साध्य होईपर्यंत युद्ध सुरूच राहील. ते म्हणाले की, ओलिसांना परत करणे ही सर्वोच्च प्राथमिकता आहे आणि मी त्यासाठी वचनबद्ध आहे.
7 ऑक्टोबरपासून रक्तरंजित युद्ध सुरू
हमासच्या सैनिकांनी सीमा ओलांडल्यानंतर 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलने गाझावर हल्ला करण्यास सुरुवात केली, 1,200 ठार आणि 200 हून अधिक ओलीस घेतले. गाझाच्या हमास संचालित आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे की इस्रायली मोहिमेमध्ये 5,000 हून अधिक मुलांसह 14,000 हून अधिक लोक मारले गेले आहेत