Download App

पाकिस्तानच्या अडचणीत पुन्हा वाढ, सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय

Mohammed bin Salman Pakistan Visit : आधीच अडचणीत असणाऱ्या पाकिस्तानला सौदी अरेबियाने मोठा धक्का दिला आहे. सौदी अरेबियाचे क्राउन

Mohammed Bin Salman Pakistan Visit : आधीच अडचणीत असणाऱ्या पाकिस्तानला (Pakistan) सौदी अरेबियाने (Saudi Arabia) मोठा धक्का दिला आहे. सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान (Crown Prince Mohammed bin Salman) 19 मे रोजी दोन दिवसांच्या पाकिस्तान दौऱ्यावर येणार होते मात्र आता अज्ञात कारणांमुळे हा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. अचानक हा दौरा पुढे ढकलल्याने पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे.

याबाबत माहिती देताना पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाच्या प्रवक्त्या मुमताज झहरा बलोच म्हणाले की, इस्लामाबाद आणि रियाध यांच्यातील कार्यक्रम निश्चित होताच त्याचा तपशील सार्वजनिक करण्यात येईल. सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमानची पाकिस्तानची जनता आतुरतेने वाट पाहत आहे. असं पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाच्या प्रवक्त्या मुमताज झहरा बलोच म्हणाले.

तर दुसरीकडे मार्च महिन्यात पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर गेले होते. तर सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या पाकिस्तान दौऱ्यात राजनैतिक आणि व्यापारसंबंधी चर्चा होणार असल्याची माहिती आहे. यामुळे पाकिस्तानसाठी हा दौरा खूप महत्वाचा होता मात्र क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी अचानक हा दौरा पुढे ढकलल्याने आधीच अडचणीत असणाऱ्या पाकिस्तानच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

क्रिकेट लीजेंड जेम्स अँडरसन घेणार निवृत्ती, ‘या’ संघाविरुद्ध खेळणार शेवटचा सामना

या दौऱ्याच्या माध्यमातून पाकिस्तानला सौदी अरेबियाकडून मोठ्या गुंतवणुकीची अपेक्षा आहे. मोहम्मद बिन सलमान यांचा पाच वर्षानंतर हा पाकिस्तानचा पहिला दौरा होता. यापूर्वी त्यांनी फेब्रुवारी 2019 पाकिस्तानचा दौरा केला होता. ते 2022 मध्ये देखील पाकिस्तानचा दौरा करणार होते मात्र शेवटच्या क्षणी हा दौरा रद्द करण्यात आला आहे.

follow us