क्रिकेट लीजेंड जेम्स अँडरसन घेणार निवृत्ती, ‘या’ संघाविरुद्ध खेळणार शेवटचा सामना
James Anderson Retirement: क्रिकेट लीजेंड आणि इंग्लडचा महान गोलंदाज जेम्स एंडरसनने (James Anderson) मोठी घोषणा करत क्रिकेटमधून (International Cricket) निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने इंस्टाग्राम पोस्टद्वारे (Instagram Post) याबाबत माहिती दिली.
अँडरसनने इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले आहे की, या समरमध्ये लॉर्ड्सवर खेळवला जाणारा पहिला सामना माझा शेवटचा सामना असणार आहे. जेम्स एंडरसन 2003 मध्ये पहिला कसोटी सामना खेळाला होता. तो आता तब्बल 20 वर्षांनंतर क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे.
यावर्षी वेस्ट इंडिजचा संघ इंग्लंडचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात इंग्लड आणि वेस्ट इंडिज तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेचा पहिला सामना लॉर्ड्सवर खेळवला जाणार असून तो सामना महान गोलंदाज जेम्स एंडरसनच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना असणार आहे.
कसोटीत सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत एंडरसन तिसऱ्या क्रमांकावर आहे तर कसोटी क्रिकेटमध्ये 700 बळी घेणारा तो पहिला वेगवान गोलंदाज आहे. एंडरसनने आतापर्यंत 187 कसोटी सामन्यात 700 विकेट्स घेतले आहे. याच बरोबर अँडरसन हा इंग्लंडचा सर्वात यशस्वी गोलंदाज देखील आहे.
‘मत दिलं नाहीतर पंकजा मुंडेंना साताऱ्यातून निवडून आणेन’ बीडकरांसमोर उदयनराजे भोसलेंची मोठी घोषणा
इंस्टाग्राम पोस्टमध्ये अँडरसनने लिहिले की, गेल्या 20 वर्ष इंग्लंडचे प्रतिनिधित्व करताना खूप आनंद मिळाला, मात्र आता निवृत्ती घेण्याची आणि इतर खेळाडूंना संधी देण्याची ही योग्य वेळ आहे. जेणेकरुन तेही त्यांची स्वप्ने मी जसे जगले तसे जगू शकतील. असं इंस्टाग्राम पोस्टमध्ये अँडरसनने लिहिले आहे.