वय 41 वर्ष, अन् 700 विकेट्स तरीही सचिनचं रेकॉर्ड तुटलं नाही; दिग्गज खेळाडूचं ‘हीट’ क्रिकेट..
James Anderson Retirement : इंग्लंड संघाचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने शनिवारी (James Anderson) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. कोणत्या संघाबरोबर आणि कधी अंतिम सामना खेळणार याबाबत माहिती दिली. अँडरसनच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे महारेकॉर्ड (Sachin Tendulkar) मात्र अबाधित राहिले आहे. अँडरसन सचिनचे रेकॉर्ड तोडू शकत होता परंतु आता हे शक्य होणार नाही.
जुलै महिन्यात वेस्टइंडीज विरोधात खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यानंतर अँडरसन क्रिकेटमधून निवृत्त होईल. शनिवारी अँडरसनने या निर्णयाची माहिती दिली. कसोटी क्रिकेट मध्ये तब्बल 700 विकेट्स घेणारा अँडरसन हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आहे. जुलै महिन्यात तो 42 वर्षांचा होईल. अँडरसनने एकूण 187 कसोटी सामन्यात 700 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे रेकॉर्ड तुटण्यापासून वाचले.
कसोटी क्रिकेट मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अँडरसन तिसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत श्रीलंकेचा माजी फिरकीपटू मुथैया मुरलीधरन पहिल्या क्रमांकावर आहे. मुरलीधरनने कसोटी क्रिकेट मध्ये एकूण 800 विकेट्स घेतल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावरील शेन वॉर्नने 708 विकेट्स घेतल्या आहेत. यानंतर अँडरसनचा नंबर आहे.
काय सांगता! सामन्याआधी टॉस होणार नाही? BCCI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत..
अँडरसन म्हणाला, देशाचे प्रतिनिधित्व करताना माझ्यासाठी 20 वर्षे अविश्वसनीय अशीच राहिली. आता येथून पुढे इंग्लंड संघासाठी खेळणे शक्य होणार नाही. कारण आता बाजूला होण्याची आणि दुसऱ्या खेळाडूंना त्यांचे स्वप्न साकार करू देण्याची हीच योग्य वेळ आहे. तेच मी आता केलं आहे. यापेक्षा दुसरी कोणती गोष्ट मोठी नाही असं मला वाटतं. दरम्यान, येत्या 10 ते 14 जुलै दरम्यान इंग्लंड आणि वेस्टइंडीज दरम्यान पहिला कसोटी सामना लॉर्ड्स मैदानावर होणार आहे.
सर्वात जास्त कसोटी सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर आहे. तर जेम्स अँडरसनचा दुसरा क्रमांक आहे. सचिनने 200 कसोटी सामने खेळले आहेत. त्यांनतर दुसऱ्या क्रमांकावरील जेम्स अँडरसनने 187 सामने खेळले आहेत. जुलै महिन्यातील अखेरचा कसोटी सामना हा त्याच्या कारकिर्दीतील 188 वा सामना असेल.
चेंडू स्विंग करण्याची जबरदस्त क्षमता असणाऱ्या अँडरसनने 2015 मध्ये अखेरचा एकदिवसीय सामना खेळला होता. अँडरसनने 194 वन डे सामन्यांत 269 विकेट्स घेतल्या तर 19 टी 20 सामन्यांत त्याच्या नावावर 18 विकेट्स आहेत. अँडरसनने 296 प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यांत 1114 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर आता अँडरसनच्या क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम मिळाला आहे.
T20 World Cup : टी 20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची जर्सी लाँच; खेळाडू दिसणार नव्या रंगात