Download App

WhatsApp ने आणले जबरदस्त फिचर; यूजर्सची होणार डबल मजा

  • Written By: Last Updated:

WhatsApp New Feature : संपूर्ण जगात लोकप्रिय असणारा मेसेजिंग ॲप WhatsApp नेहमीच यूजर्सला जास्त सुरक्षा देण्यासाठी काहींना काही अपडेट आणत असतो. अशाच एक अपडेट आता कंपनीकडून देण्यात येत आहे. या फिचरमुळे यूजर्सना मोठा फायदा होणार आहे.

या फिचरमुळे आता व्हॉट्सॲपवर प्रोफाईल पिक्चर्सचे स्क्रीनशॉट घेता येणार नाही. गेल्या काही दिवसांपासून यूजर्स याची मागणी करत होते. अनेकजण व्हॉट्सॲपवर (WhatsApp) कोणाचीही प्रोफाइल इमेजचं स्क्रीनशॉट (screenshots ) घेऊन तो एडिट करून त्याचा गैरवापर करत होते. यामुळे लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. मात्र आता असं होणार नाही. कंपनीने आता डीपी स्क्रीनशॉट ब्लॉकिंग (DP screenshot blocking) फिचर आणण्यास सुरुवात केली आहे. सध्या याबाबात कंपनीकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही मात्र काही यूजर्सच्या ॲपमध्ये हे फिचर दिसत आहे.

स्क्रीन शॉट घेताच मेसेज येईल

या नवीन फिचरमुळे आता जर एखाद्याने तुमच्या डीपीचे स्क्रीशॉट घेतले तर तुम्हाला याचा मेसेज येईल. अँड्रॉइड सेंट्रलने हे नवीन फिचर स्पॉट केले आहे. त्यांच्या मते, जर एखाद्या यूजरने एखाद्याच्या प्रोफाईल पिक्चरचा स्क्रीन शॉट घेण्याचा प्रयत्न केला, तर ते स्क्रीनवर लिहिले जाईल, म्हणजे आता कोणालाही स्क्रीनशॉट घेता येणार नाही.

सध्या हे नवीन फिचर , अँड्रॉइड-संबंधित फिचरवर लक्ष ठेवणारे अँड्रॉइड पोलिस प्लॅटफॉर्मवर देखील स्पॉट करण्यात आले आहे. यामुळे येत्या काही दिवसात सर्व यूजर्सना फीचर मिळण्यास सुरुवात होईल.

गेल्या काही दिवसांपासून WhatsApp यूजर्सच्या गोपनीयतेसाठी अनेक फीचर्सवर काम करत आहे. काही महिन्यांपूर्वी कंपनीकडून व्यू वन्स फीचरसह स्क्रीनशॉट घेण्यावर बंदी घालण्यात आली होती. तर आता प्रोफाईल पिक्चरसह हे फीचर आणल्यामुळे यूजर्सना मोठा दिलासा मिळणार आहे.

follow us

वेब स्टोरीज