Download App

मालदीवचा पर्यटन उद्योग संकटात! भारतीय पर्यटकांनी फिरवली पाठ, पर्यटन संख्येत ३३ टक्के घट

  • Written By: Last Updated:

India-Maldives row : भारतासोबतच्या वादामुळे मालदीवची (Maldives) अवस्था दयनीय झाली आहे. भारताने मालदीवच्या पर्यटनावर बहिष्कार टाकल्यानंतर मालदीवमधील पर्यटन उद्योग (tourism industry) पुरता संकटात सापडला आहे. मालदीवच्या पर्यटन मंत्रालयाने शेअर केलेल्या आकडेवारीनुसार, मालदीवला भेट देणाऱ्या भारतीय पर्यटकांच्या संख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत 33 टक्क्यांनी घट झाली आहे.

 अभिनेते सुनील तावडेनी केला लेकाच्या चित्रपटाचं खास सेलिब्रेशन, शेअर केले खास व्हिडिओ 

वास्वविक मालदीवच्या अर्थव्यवस्थेत पर्यटन उद्योग हा महत्त्वाचा घटक आहे. मात्र, भारताच्या बहिष्कारानंतर आता हा उद्योग संकटात आहे. मागच्यावर्षी मार्च महिन्यात मालदीवला येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येमध्ये भारत दुसऱ्या स्थानी होता. मात्र, यंदा भारत सहाव्या स्थानावर आहे. या वर्षी मार्च महिन्यात जवळपास 27 हजार पर्यटक मालदीवला गेले. यासंदर्भातील आकडेवारी पर्यटन मंत्रालयाने जारी केली आहे. या पर्यटन मंत्रालयाच्या 2023 च्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी 4 मार्चपर्यंत 41,054 भारतीय पर्यटकांनी मालदीवला भेट दिली होती. त्याच वेळी, यावर्षी 2 मार्चपर्यंत भारतीय पर्यटकांची संख्या 27,224 इतकी नोंदवली गेली. म्हणजेच यंदा भारतीय पर्यटकांची संख्या तब्बल 33 टक्क्याने घटली आहे.

रेल्वे विभागात ९००० हून अधिक पदांसाठी भरती सुरू, कोणाला करता येणार अर्ज? 

पीएम मोदींवर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती
वस्तुत: मालदीवच्या तीन उपमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्याच्या छायाचित्रांवरून त्यांच्या विरोधात अपमानास्पद टिप्पणी केली, त्यानंतर दोन्ही देशांमधील वाद वाढला. यानंतर पीएम मोदींनी बीच पर्यटन आणि देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी भारतीय बेटांना डेस्टिनेशन म्हणून विकसित करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळंच लक्षद्वीपला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. हेच मालदीवच्या पर्यटक संख्येमध्ये घट होण्यामागच कारण आहे.

दरम्यान, मालदीव आणि भारताचा वाद झाल्यानंतर नवी दिल्लीने मालदीवच्या राजदूताला बोलावून या व्हायरल पोस्टचा तीव्र निषेध नोंदवला. त्यादरम्यान तीनही उपमंत्र्यांना निलंबित करण्यात आले असून ते वेतनासह निलंबित राहणार आहेत.

चिनी पर्यटकांची संख्या वाढली
मालदीवला जाणाऱ्या चिनी पर्यटकांची संख्या वाढली आहे. यावर्षी मार्च महिन्यात जवळपास 54 हजार चिनी नागरिकांनी मालदीवला भेट दिलीय एएनआय वृत्तसंस्थेनुसार, भारत 2021-23 साठी मालदीवसाठी दरवर्षी 2,00,000 हून अधिक पर्यटकांसह सर्वोच्च पर्यटन बाजारपेठ राहिला. तथापि, या वर्षी आतापर्यंत 54,000 हून अधिक पर्यटकांची आवक असलेली चीन ही सर्वोच्च बाजारपेठ आहे.

follow us