रेल्वे विभागात ९००० हून अधिक पदांसाठी भरती सुरू, कोणाला करता येणार अर्ज?

रेल्वे विभागात ९००० हून अधिक पदांसाठी भरती सुरू, कोणाला करता येणार अर्ज?

RRB Technician Recruitment : भारतीय रेल्वे (Indian Railways) ही जगातील चौथी मोठी रेल्वे सेवा आहे. या भारतीय रेल्वेचे जाळे देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. रेल्वेने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. रेल्वे विभागाच्या देखरेखीसाठी रेल्वे मंत्रालयाला मनुष्यबळाची आवश्यकता असते. यासाठी रेल्वे प्रशासन भरती प्रक्रियेचे आयोजन करते. दरम्यान, नोकरीच्या (Job) शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आताही एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे, नुकतीच रेल्वे भर्ती बोर्डाने भरतीसाठी एक अधिसुचना काढली. या मेगा भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. ही भरती कोणत्या पदांसाठी आहे? अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे? आवश्यक वयोमर्यादा याबाबत जाणून घेऊ.

Sonali Kulkarni : ‘अप्सरा’ सोनालीच्या अदा पाहून नेटकरी फिदा! 

एकूण 9144 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. ही भरती तंत्रज्ञ ग्रेड I, तंत्रज्ञ श्रेणी II या दोन पदांसाठी आहे. या पदभरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. अर्जाची प्रक्रिया ९ मार्चपासून सुरू झाली आहे.

पदाचे नाव – रेल्वे भर्ती बोर्डाअंतर्गत खालील दोन पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
1. तंत्रज्ञ ग्रेड I
2. तंत्रज्ञ ग्रेड II

वय श्रेणी –

तंत्रज्ञ ग्रेड I – १८ ते ३६ वर्षे

तंत्रज्ञ ग्रेड II – 18 ते 33 वर्षे

अर्ज फी –
सर्व उमेदवारांसाठी अर्जाची फी 500 रुपये आहे तर SC, ST, माजी सैनिक, PWED आणि महिला उमेदवारांसाठी अर्ज फी रुपये 250 आहे.

अर्ज पद्धत –
तंत्रज्ञ ग्रेड I आणि तंत्रज्ञ श्रेणी II च्या पदभरतीसाठी उममेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल.

पगार –
तंत्रज्ञ ग्रेड I – रु 29,200
तंत्रज्ञ ग्रेड II – 19,900 रु

मंत्रालयाच्या इमारतीला भीषण आग, 5-7 जण आत अडकले; महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक

निवड प्रक्रिया – या पदांसाठी निवड ही संगणक आधारित चाचणीद्वारे होईल.

अर्ज सुरू करण्याची तारीख – 9 मार्च 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 एप्रिल 2024

अधिकृत वेबसाइट –
https://Indianrailways.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवरून तुम्ही तपशीलवार माहिती मिळवू शकता.

अधिसुचना – https://www.rrbajmer.gov.in/Upload_PDF/638423208075866721.pdf

अर्ज कसा करायचा?
उमेदवारांना आपला अर्ज ऑनलाइन करावा लागेल.
अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी.
कारण अर्ज करतांना चुकीची माहिती भरल्यास अर्ज नाकारल्या जाईल.
अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करा.
आपली योग्य माहिती भरून शेवटी प्रवेश शुल्क भरावं.
आणि अर्जाची प्रिंटआउट काढून आपल्यासोबत ठेवावी.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube