Pahalgam Terror Suspects : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारतीय गुप्तचर यंत्रणेने संभाव्य संशयितांना ओळखल्यानंतर शोध मोहीम सुरु करण्यात आली आहे. या प्रकरणात श्रीलंकेत देखील शोध मोहिम राबवण्यात येत आहे. शनिवारी चेन्नईहून (Chennai) येणाऱ्या श्रीलंकेच्या एअरलाइन्सच्या (Sri Lankan Airlines) विमानावर बंदरनायके आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Bandaranaike International Airport) विशेष सुरक्षा मोहीम सुरु आहे. या विमानात सहा संशयित दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांनी विमानाच्या आगमनानंतर शोध मोहीम सुरु केली आहे.
याबाबत श्रीलंकेच्या एअरलाइन्सने म्हटले आहे की, फ्लाइट यूएल 122 चेन्नईहून कोलंबो (Colombo) येथे पोहचल्यानंतर सुरक्षा अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात आली. आज (3 मे) रात्री 11:59 वाजता चेन्नईहून कोलंबो येथे पोहोचलेल्या 4आर-एएलएस विमानाने चालवलेले फ्लाइट यूएल 122 चे आगमन होताच व्यापक सुरक्षा तपासणी करण्यात आली अशी माहिती श्रीलंका एअरलाइन्सकडून देण्यात आली आहे.
चेन्नई एरिया कंट्रोल सेंटरकडून भारतात हवा असलेला संशयित व्यक्ती, जो विमानात असल्याचे मानले जात होते या अलर्टनंतर स्थानिक अधिकाऱ्यांशी समन्वय साधून हे ऑपरेशन करण्यात आले अशी माहिती देखील एअरलाइन्सकडून देण्यात आली आहे.
विमानाची तपासणी करण्यात आली आणि त्यानंतर पुढील ऑपरेशनसाठी परवानगी देण्यात आली. अनिवार्य सुरक्षा प्रक्रियेमुळे, सिंगापूरला जाणारी पुढील नियोजित सेवा – फ्लाइट UL308 उशिरा आली. असं देखील एअरलाइन्सकडून सांगण्यात आले आहे. आमच्या प्रवाशांची आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षितता ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे आणि आम्ही सुरक्षेचे सर्वोच्च प्रयत्न करत आहोत असेही एअरलाइन्सकडून सांगण्यात आले आहे.
मुलीने अचानक थांबवली स्कूटर अन् उचलला रस्त्यावर असणारा पाकिस्तानी ध्वज, व्हिडिओ व्हायरल
तर दुसरीकडे 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. जम्मू आणि काश्मीर कलम 370 रद्द केल्यानंतर हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता असं सांगण्यात येत आहे. पाकिस्तानस्थित बंदी घातलेल्या लष्कर-ए-तैयबाचा एक भाग असलेल्या रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) ने दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.