Pahalgam Terror Attack : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव (India Pakistan Tension) प्रचंड वाढला आहे. पाकिस्तानवर भारत कधीही (Pahalgam Terror Attack) हल्ला करू शकतो अशी चिंता पाकिस्तानी राज्यकर्त्यांना सतावत आहे. यासाठी या कंगाल देशाकडून चीन आणि रशियाला मदत मागितली जात आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क टाइम्सने एका वृत्तात म्हटले आहे की पहलगामवरुन जो तणाव निर्माण झालाय तो कमी करण्याऐवजी पाकिस्तान (Pakistan News) यात आणखी भर घालत आहे.
पाकिस्तानकडून ही जी चूक होत आहे त्याचे सविस्तर विश्लेषण वृत्तपत्राने केले आहे. एक भारतीय जवान सध्या पाकिस्तानच्या ताब्यात आहे. पहलगाम हल्ल्यानंतर दोन दिवसांनंतर फिरोजपूर बॉर्डरवर बीएसएफचा काँस्टेबल चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेला. पाकिस्तानी मीडियातही अशाच बातम्या आल्या आहेत. जियो न्यूजनुसार काँस्टेबलला ड्युटीवर असताना बॉर्डर लक्षात आली नाही आणि चुकून त्यांनी नियंत्रण रेषा (एलओसी) पार केली. यानंतर पाकिस्तानच्या सैन्याने या जवानांना ताब्यात घेतले.
Pahalgam Attack: IGNOUतून शिक्षण, मग पाकिस्तान गाठलं, मास्टरमाइंड आदिल हुसैन आहे तरी कोण?
न्यूयॉर्क टाइम्सनुसार याआधीही दोन्ही देशांदरम्यान अशा घटना घडल्या आहेत. या घटना दोन्ही देशांचे बॉर्डरवरील अधिकारीच मार्गी लावत होते. यासाठी फ्लॅग मिटींग आयोजित केली जात होती. परंतु, यावेळी पाकिस्तानने काँस्टेबलला सोडण्यास नकार दिला. फ्लॅग मीटिंगच्या माध्यमातून भारताने अनेक वेळा प्रयत्न केला मात्र काही उपयोग झाला नाही. यामुळे दोन्ही देशांतील तणाव आणखी वाढला आहे. पाकिस्तानचा हा निर्णय भारताला चिडवणारा आणि प्रत्युत्तरास भाग पाडणारा असल्याचे न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
एक दिवसापूर्वी वृत्तपत्राने रिपोर्टमध्ये म्हटले होते की भारत पीओकेत सर्जिकल स्ट्राइक करण्याच्या तयारीत आहे. रिपोर्टमध्ये भारताची ही संभाव्य तयारी दहशतवादाचा बिमोड करण्याच्या उद्देशाने असल्याचे म्हटले होते.
जम्मू काश्मीरातील पहलगाम येथे काल (Pahalgam Terror Attack) दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या भ्याड हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला. हल्ल्यात या अतिरेक्यांनी हिंदू धर्मियांना टार्गेट केलं. त्यांची धार्मिक ओळख आणि नावं विचारून (Jammu Kashmir Attack) त्यांना गोळ्या घातल्या. भारताचं स्वित्झर्लंड म्हणून ओळखलं जाणारं पहलगाम रक्तरंजित झालं. या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींवर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.