Download App

कर्जबाजारी पाकिस्तान! सोळा वर्षात 11 पटीने वाढलं कर्ज; आकडा ऐकून बसेल धक्का

आर्थिक अडचणींना तोंड देत असलेल्या पाकिस्तानवर कर्जाचा (Pakistan News) भार सातत्याने वाढत चालला आहे.

Pakistan Debt 2024 : आर्थिक अडचणींना तोंड देत असलेल्या पाकिस्तानवर कर्जाचा (Pakistan News) भार सातत्याने वाढत चालला आहे. आता तर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की आधीच्या कर्जाचे हप्ते देण्यासाठी नवीन कर्ज घ्यावे लागत आहे. या मुळे पाकिस्तान वेगाने दिवाळखोरीकडे प्रवास करू लागला आहे. पाकिस्तानच्या अर्थ मंत्रालयाने संसदेत मोठा खुलासा केला. यानुसार मागील 16 वर्षांच्या काळात पाकिस्तानवरील कर्ज 61.4 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे.

सन 2008 मध्ये हे कर्ज 6.1 लाख कोटी रुपये होते. आता या वर्षाच्या अखेरपर्यंत कर्ज 67.5 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. पाकिस्तानी अर्थमंत्र्यांनी संसदेत याबाबत माहिती दिली. देशावरील कर्जात वाढ होण्यामागे अनेक कारणे आहेत. यामध्ये 10.2 ट्रिलियन रुपयांचा तोटा, 32.30 लाख कोटी रुपयांचे व्याज आणि विनिमय दर ही कारणे प्रमुख आहेत. वित्त मंत्रालयानुसार जून 2024 पर्यंत बँकांवरील एकूण कर्ज 38 हजार 531 अब्ज रुपये होते. या बँकांनी जून 2024 पर्यंत सरकारी क्षेत्राला 27  हजार 246 अब्ज रुपये उधार दिले होते. तसेच या बँकांनी 8 हजार 776 अब्ज रुपयांचे कर्ज खासगी क्षेत्राला दिले होते.

अवघ्या एक रूपयात पाकिस्तानची बोलती बंद करणारे हरिश साळवे विनेश फोगटसाठी मैदानात

2008 मध्ये पाकिस्तानवर किती होते कर्ज

जून 2008 मध्ये पाकिस्तानवर एकूण देशांतर्गत कर्ज 3.3 लाख कोटी तर विदेशी कर्ज 2.9 लाख कोटी रुपये इतके होते. नंतर यामध्ये सातत्याने वाढ होत गेली. आता जून 2024 पर्यंत देशांतर्गत कर्ज 43.4 लाख कोटी रुपये तर विदेशी कर्ज 24.1 लाख कोटी रुपये होते. यामुळे देशांतर्गत कर्जात 40.2 लाख कोटी रुपये तर विदेशी कर्जात 21.3 लाख कोटी रुपयांची वाढ झाली. संसदेत दिल्या गेलेल्या या माहितीवरून लक्षात येते की प्राथमिक तोट्यामुळे 10.2 लाख कोटी रुपयांनी कर्जात वाढ झाली तर व्याज व्ययाच्या कारणामुळे कर्जात 32.3 लाख कोटी रुपयांनी वाढ झाली. अन्य काही गोष्टीमुळे कर्ज 18.9 लाख कोटी रुपयांनी वाढले.

कर्जाच्या ओझ्यात कसा दबला पाकिस्तान

सन 2008 मध्ये पाकिस्तानवर 6.1 लाख कोटी रुपयांचे सरकारी कर्ज होते. हेच कर्ज 2013 मध्ये 12.7 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचले होते. 2013 मध्ये 14.3 अब्ज रुपये, 2018 मध्ये 25 अब्ज रुपये, 2019 मध्ये 32.7 लाख कोटी, 2022 मध्ये 49.2 लाख कोटी, 2023 मध्ये 62.9 लाख कोटी तर मार्च 2024 मध्ये राष्ट्रीय कर्ज 67.5 लाख कोटी रुपये इतके होते. सन 2019 मध्ये या कर्जात 7.8 लाख कोटी रुपये, 2022 मध्ये 9.4 लाख कोटी रुपये तर 2023 मध्ये 13.6 लाख कोटी रुपयांची वाढ झाल्याचे दिसून आले.

कंगाल पाकिस्तानवर कर्जाचा भार; स्टेट बँकेने जारी केली धक्कादायक आकडेवारी

follow us