Download App

Pakistan Elections : अखेर ठरलं! नवाज शरीफ यांची माघार, शहबाज शरीफ होणार पाकिस्तानचे PM

Pakistan Elections 2024 : पाकिस्तानात निवडणुका होऊन निकाल हाती (Pakistan Elections 2024) आले आहेत. यानंतर आता राजकीय पक्षांनी सरकार स्थापन करण्याच्या दिशेने हालचाली सुरू केल्या आहेत. माजी पंतप्रधान नवाज शरीफ (Nawaz Sharif) यांच्या पक्षाचे सरकार येणार हे आता निश्चित झाले आहे. नवाज शरीफ हेच पंतप्रधान होतील असा अंदाज आतापर्यंत बांधला जात होता. परंतु, त्यांनी पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून माघार घेतली आहे. पीएमएलएनचे अध्यक्ष शहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांना पंतप्रधानपदासाठी नामित करण्यात आले आहे. पक्षाच्या प्रवक्त्या मरियम औरंगजेब यांनी सांगितले की पक्षाचे अध्यक्ष शहबाज शरीफ पंतप्रधान पदासाठी तर मरियम यांना पंजाबच्या मुख्यमंत्रिपदासाठी नामित करण्यात आले आहे.

माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) सध्या तुरुंगात आहेत. त्यांच्या पक्षाने या नव्या सरकारमध्ये स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षाला वगळून अन्य पक्षांना सोबत घेत शरीफ यांचे सरकार स्थापन होईल असे दिसत आहे. शहबाज शरीफ याआधीही पाकिस्तानचे पंतप्रधान राहिले आहेत.

Pakistan Elections : आश्चर्यच! जिंकलेल्या उमेदवारांनीच घेतली माघार; पाकिस्तानात चाललंय तरी काय?

पाकिस्तान पीपुल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो यांनी सांगितले होते की त्यांचे वडिल असिफ जरदारी यांना राष्ट्रपती पदासाठी संधी मिळावी. जरदारी याआधी 2008 ते 2013 या काळात राष्ट्रपती होते. बिलावल भुट्टो यांनी स्पष्ट केले की त्यांचा पक्ष सरकारमध्ये सहभागी होणार नाही मात्र शरीफ यांच्या उमेदवारांना पाठिंबा देईल.

दरम्यान, शरीफ परिवाराची जनतेत नकारात्मक प्रतिमा तयार होऊ नये यासाठी शहबाज शरीफ यांचे नाव पंतप्रधान पदासाठी पुढे करण्यात आले आहे. इम्रान खान यांच्या पक्षाने समर्थित केलेले उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. यामुळे नवाज शरीफ यांना मोठा धक्का बसला आहे. निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गडबडी झाल्याचा आरोप केला जात असल्याने शरीफ यांच्या पक्षावर टीका होत आहे.

पराभूत उमेदवारांची न्यायालयात धाव; हेराफेरी झाल्याचा आरोप करत याचिका दाखल

पाकिस्तानात निवडणुका झाल्या परंतु सेनेला पाहिजे तशा झाल्या नाहीत. इम्रान खान यांच्या अपक्ष उमेदवारांनी अनेक अडचणींचा सामना करत 100 पेक्षा जास्त जागा जिंकल्या. सत्ताधारी शरीफ आणि पाकिस्तानी सेनेसाठी हा निकाल अनपेक्षित होता. पीएमएलएम आणि पीपीपी हे दोन्ही पक्ष 100 चा आकडा गाठू शकले नाहीत. यानंतर बिलावल भुट्टो यांनी पीएमएलएनला बाहेरून पाठिंबा देणार असल्याचे स्पष्ट केले. बिलावल भुट्टो सुद्धा पंतप्रधान पदाच्या शर्यतीत होते मात्र त्यांच्या पक्षाच्या खराब कामगिरीमुळे त्यांना या शर्यतीतून माघार घ्यावी लागली.

follow us