पराभूत उमेदवारांची न्यायालयात धाव; हेराफेरी झाल्याचा आरोप करत याचिका दाखल
Pakistan Election : पाकिस्तानात निवडणूक पार पडल्या आहेत. अद्याप निवडणुकीचा संपूर्ण निकाल जाहीर झालेला नाही. अशातच आता निवडणुकीत पराभूत झालेल्या इम्रान खान समर्थकांनी हेराफेरीबाबत न्यायालयात धाव घेतली आहे. यातील अनेक उमेदवारांना इम्रान खानच्या तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचा पाठिंबा मिळत आहे. हेराफेरीबाबत याचिका दाखल करणाऱ्या उमेदवारांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती.
Lok Sabha Elections : “दानवेंनी गद्दारी केल्याने लोकसभेत पराभव”; ठाकरेंच्या नेत्याचा गौप्यस्फोट
पाकिस्तानात निवडणूक पार पडली. या निवडणूकीत हेराफेरी झाली असल्याचा आरोप पराभत उमेदवारांकडून करण्यात आला आहे. पाकिस्तानातील निवडणूकीत पराभूत झालेल्या उमेदवारांमध्ये अनेक बड्या नेत्यांचा समावेश आहे. परवेझ इलाही, पत्नी क्विसेरा, खैबर पख्तुनख्वाचे माजी अर्थमंत्री तैमूर झागरा, महमूद जान, वकील शुएब शाहीन, यास्मिन रशीद, उस्मान दार, रेहाना दार यांच्यावरही निवडणुकीत फेरफार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Prithviraj Chavan : राज्यातील गुन्हेगारीला सरकारकडून राजाश्रय; पृथ्वीराज चव्हाण कडाडले
विनयभंगाचा आरोप
उच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या उमेदवारांनी फॉर्म 47S मध्ये छेडछाड केल्याचा आरोप केला आहे. माजी पंतप्रधान नवाझ शरीफ, त्यांची मुलगी मरियम नवाज, अताउल्लाह तरार आणि माजी संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांना विजयी करण्यासाठी निवडणुकीत हेराफेरी करण्यात आल्याचे स्वतंत्र याचिकांमध्ये म्हटले आहे.
याचिकाकर्त्यांनी म्हटले की, जेव्हा त्यांना फॉर्म 45 देण्यात आला होता, त्यानुसार ते निवडणूक जिंकत होते. यानंतर, त्यांच्या अनुपस्थितीत फेरफार करण्यात आला आणि त्यांना फॉर्म 47 मध्ये पराभूत घोषित करण्यात आले. पराभूत उमेदवारांनी निकालात फेरफार करण्यासाठी संगनमत केल्याचा आरोप केला आहे आणि फॉर्म 45S च्या आधारे फॉर्म 47 निकाल तयार करण्याची मागणी केली आहे.