Pakistan Election : नवाज शरीफांच्या बालेकिल्ल्यात इम्रान समर्थकांची आघाडी; मंत्र्यांची धाकधूक वाढली

Pakistan Election : नवाज शरीफांच्या बालेकिल्ल्यात इम्रान समर्थकांची आघाडी; मंत्र्यांची धाकधूक वाढली

Pakistan Election Result 2024 : पाकिस्तानात नवीन सरकार निवडण्यासाठी काल (Pakistan Election Result 2024) मतदान झाले. त्यानंतर आज सकाळपासूनच मतमोजणीला सुरुवात झाली आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) आणि नवाज शरीफ शरीफ (Nawaz Sharif) यांच्या पक्षात लढाई आहे. सकाळच्या सत्रातील मतमोजणीचे कल हाती येत आहेत. मात्र, या मतमोजणीआधीच गोंधळालाही सुरुवात झाली आहे. मतमोजणी बराच काळ बंद होती. त्यामुळे निकालाची माहिती प्रसारमाध्यमांना मिळत नव्हती. इम्रान खान यांनीही निकालाचे अपडेट त्यांच्या सोशल मीडिया पेजवरून दिले नव्हते. या गोंधळात दोन तास निघून गेले. त्यानंतर आयोगाने निकाल देण्यास सुरुवात केली.

Pakistan Election : पाकिस्तानात आज मतदान; ‘वांगी’, ‘सिमकार्ड’ अन् ‘फुगा’ निवडणूक चिन्हांचीच चर्चा

सुरुवातीच्या टप्प्यातील निकालात पंजाब आणि खैबर पख्तूनख्वा भागात बहुतांश जागांवर इम्रान खान यांच्या तहरीक ए इंसाफ पक्षाने विजय मिळवल्यानंतर निकाल देणे बंद झाले होते. मात्र या गोष्टीला जोरदार विरोध झाल्यानंतर पुन्हा निकाल देण्यास सुरुवात झाली. अल जझीरा या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, मतमोजणीत बिलावल भुट्टो यांच्या पीपीपीने 2,नवाज शरीफ यांच्या पीएमएलएन आणि इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाने प्रत्येकी चार जागांवर विजय मिळवला. सुरुवातीच्या मतमोजणी इम्रान खान यांचा पक्ष आघाडीवर दिसत आहे. त्यामुळे त्यांनी विजयाचा दावा करण्यास सुरुवात केली आहे.

रावळपिंडी मतदारसंघातील पीटीआय समर्थित उमेदवार बशारत राजा यांनी फॉर्म 45 आणि 47 च्या निकालांत तफावत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी 50 हजार मतांची आघाडी घेत ही जागा जिंकली आणि त्यांचे विरोधक मतदारसंघातील एकाही मतदान केंद्रावर विजयी झाले नाहीत, असे त्यांनी सांगितले. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या प्राथमिक निकालांनुसार पीटीआय समर्थत उमेदवार सलीम रहमान यांनी स्वतःच्या मतदारसंघात 84 हजार 411 मतांनी विजय मिळवला आहे. निवडणूक आयोगाने शुक्रवारी 4 राष्ट्रीय संसदीय जागांचे निकाल जाहीर केले. यातील दोन जागा नवाज शरीफ यांच्या पक्षाने आणि अन्य दोन जागा अपक्ष उमेदवारांना जिंकल्या आहेत.

Pakistan Hits Iran : पाकिस्तानचा पलटवार! इराणमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर एअर स्ट्राईक?

बिलावल भुट्टो सध्या पिछाडीवर पडले आहेत. एमए-127 मतदारसंघात बिलावल कदाचित पराभूत होऊ शकतात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या मतदारसंघात इम्रान समर्थक उमेदवार सध्या आघाडीवर आहे. शाहबाज सरकारमधील अनेक मंत्र्यांची धाकधूक आता वाढली आहे. शाहबाज, मरीयम शरीफ निराश झाले आहेत. विजयानंतर होणारी नवाज शरीफ यांची सभाही रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या पंजाब या बालेकिल्ल्यात इम्रान खान समर्थक उमेदवार आघाडीवरआहेत. एका मतदारसंघात तर नवाज शरीफ स्वतः मागे पडले आहे. तसेच बिलावल भुट्टो यांच्या बालेकिल्ला सिंधमध्ये सुद्धा इम्रान खान समर्थकांनी आघाडी घेतली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज