तोशाखाना भ्रष्टाचार प्रकरणी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना दोषी ठरवण्यात आल्यानंतर इम्रान खान तीन वर्ष कारावासाची शिक्षा भोगत आहेत. पंजाब प्रांतातील जेलमध्ये मिळत असलेल्या सुविधांवर इम्रान यांनी समाधान व्यक्त केलं आहे. खान यांना शिक्षा सुनावल्यानंतर पत्नी बुशरा बीबी यांनी सर्वोच्च न्यायालयाला इम्रानच्या ढासळत्या प्रकृतीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची विनंती केली. त्यानंतर पंजाबच्या गृहसचिवाकडून त्यांना सुविधा प्रदान करण्यात आल्या आहेत.
अजितदादांच्या ‘आवडत्या’ शहरात अडलं शरद पवारांचं गणित; शहराध्यक्षपदासाठी चेहराच मिळेना
नूकतील पंजाबचे आयजी जेल मिया फारुख नझीर यांनी इम्रान खान यांची जेलमध्ये भेट घेतली. या भेटीदरम्यान, त्यांनी इम्रान खान यांना मिळत असलेल्या सुविधांबद्दल विचारपूस करीत सुविधांचा आढावाही घेतला आहे. इम्रान खान यांना जेलमध्ये बेड, उशी, गादी आणि एअर कुलर देण्यात आले आहेत.
‘प्रत्येकाचा काळ असतो, तो ओळखला पाहिजे आणि नवीन पिढीला संधी दिली पाहिजे’
तसेच पंखा, नमाजासाठी खोली, मध, इंग्रजी अनुवादासह कुराणचे पुस्तक, एक वृत्तपत्र, थर्मॉस, टिश्यू पेपर आणि परफ्युमचीही सोय करण्यात आली आहे. इम्रान खानच्या नवीन वॉशरूममध्ये वेस्टर्न टॉयलेट सीट, वॉश बेसिन, साबणाचा बार, एअर फ्रेशनर टॉवेल आणि टिश्यू पेपर देण्यात आल्याची माहिती जेलर अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
घरात बसणाऱ्यांना करंट देऊन लाईनवर आणलं, CM एकनाथ शिंदेची उद्धव ठाकरेंवर जळजळीत टीका
यासोबतच इम्रान यांच्या प्रकृतीचीही काळजी प्रशासनाकडून घेतली जात असून इम्रान यांच्यासाठी जेलमध्ये पाच डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली असून, प्रत्येकी आठ तास काम करतात. आयजी जेलच्या मान्यतेने पीटीआय प्रमुखांना विशेष जेवणही दिले जाते.
डॉक्टरांच्या विशेष पथकाने तपासणी केल्यानंतर इम्रानला जेवण दिले जाते. इम्रान खान यांची पत्नी बुशरा बीबी आणि पीटीआयने त्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केल्यानंतर या सर्व सुविधा देण्यात आल्या आहेत.