‘प्रत्येकाचा काळ असतो, तो ओळखला पाहिजे आणि नवीन पिढीला संधी दिली पाहिजे’
Ajit Pawar on Sharad Pawar : नवीन कार्यकर्ते आपल्याला जवळ आणायचे आहेत. तरुण नेतृत्व आपल्याला तयार करायचे आहे. कारण आम्हाला देखील राजकारणात येऊन 30-35 वर्षे झाली आहेत. प्रत्येकाचा काळ असतो, तोही आपण बघितला पाहिजे. ओळखला पाहिजे आणि नवीन पिढी तयार केली पाहिजे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडच्या सभेत म्हटले.
काही जणांनी हल्ली धनंजय मुंडेंबद्दल वेगळ्या प्रकारची चर्चा केली पण त्या गोष्टीला मी अधिक महत्व देत नाही. मी काम करणार माणूस आहे. अधिकाऱ्यांना विचारा. चांगलं काम केलं तर आम्ही त्यांच्या पाठिशी उभा राहतो. नाही चांगलं काम केलं तर त्याचा आम्ही बंदोबस्त देखील करतो. शेवटी लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत. पाहाटे पासून कामाला सुरुवात करतो. ही आवड आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
राजकीय मैत्री जपणारा जिल्हा म्हणून आम्ही लहानपणापासून बीड जिल्ह्याला पाहतो आहेत. बीड जिल्हात जसे वैचारिक मतभेद जपले असतील पण राजकीय शत्रुत्व कधी ठेवले नाही. गोपीनाथराव मुंडे आणि विलासराव देशमुख वेगवेगळ्या पक्षात होते पण त्यांनी मैत्री जपली. पण बीड जिल्ह्यातील काही प्रश्न आहेत. बालाघाटच्या डोंगर रांगामुळे भौगोलिक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. यंदाही पाऊस कमी पडला आहे. दुष्काळाची परिस्थिती आहे. आम्ही शेतकऱ्यांना पूर्णपणे आधार आणि मदत करण्याची भूमिका सरकारची आहे. हे सांगण्यासाठी मी इथे आलो आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
ते पुढं म्हणाले की आम्ही कधी तुम्हाला अंतर देणार नाही. आम्ही निवडणुकीकरता थातुरमातुर आश्वासन देणार नाही. मागचा अनुभव बघता जे जे करायचं ठरवलं ते करुन दाखवलं. पहिल्याच कॅबिनेटमध्ये आम्ही गेलो त्यावेळी पश्चिमेकडचे पाणी पूर्वेकडे घेण्याचा प्रश्न काढला. त्यावेळी मुख्य्मंत्र्याकडून कबूल करुन घेतलं की 1 लाख कोटी लागले तरी तिकडचे पाणी गोदावरी खोऱ्यात आणायचे. मराठवाड्याला द्यायचं, असे अजित पवार यांनी सांगितले.
मुंबई-गोवा महामार्गाचं काम का होत नाही? राज ठाकरेंनी समजावूनच सांगितलं…
उद्या काळात नागपूरचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. सहा लाख कोटींचे बजेट मी सादर करणार आहे. आज बीडकरांना आश्वासन देतो की त्या अर्थसंकल्पात तुमचे प्रश्न मार्गी लावल्याशिवाय गप्प बसणार नाही, असे अजित पवार यांनी सांगितले.