‘विरोधकांना दादांच्या द्वेषाची..,’; ‘ज्यांच्या रक्तात गद्दारी’म्हणणाऱ्यांना सुनिल तटकरेंचं प्रत्युत्तर
विरोधकांना अजितदादांच्या द्वेषाची काविळ झालीयं, अशी जळजळीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे(Sunil Tatkare) यांनी विरोधकांवर केलीयं. दरम्यान, शरद पवारांच्या स्वाभिमान सभा बीडमध्ये पार पडल्यानंतर त्याचं धर्तीवर आज अजित पवार गटाची सभा पार पडली. यावेळी बोलताना सुनिल तटकरेंची विरोधकांवर निशाणा साधला आहे.
Eknath Shinde : तिघांचे वाद लवकरच बाहेर येणार; नाथाभाऊंचा दाव्याने खळबळ!
सुनिल तटकरे म्हणाले, अजितदादांचा निर्णय ऐतिहासिक आणि देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारा ठरला आहे. त्यामुळे अलीकडच्या काळात अजितदादांच्या द्वेषाची काविळ झालेली माणसं आहेत. ज्यांना मोठ्या प्रमाणावर काविळीची नशा चढलीयं असून आणखी दुसरीही नशा त्यांना चढली असावी, अशी टीका तटकरे यांनी केली आहे.
खळबळजनक! भाजप खासदाराच्या घरी फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळला 10 वर्षीय मुलाचा मृतदेह
तसेच ‘ज्यांच्या रक्तात गद्दारी’ असं ज्यांना म्हणायंचंय त्यांच्या रक्ताबद्दल त्यांना काय म्हणायंच आहे. याचं उत्तर आम्हाला पुढील काळात मिळालं तर महाराष्ट्राची जनता तुमची ऋणी राहणार असल्याचीही खोचक टीका त्यांनी यावेळी केली असून ‘शब्दाचा पक्का अजितदादा’ ही महाराष्ट्रातील दादांची ओळख आपल्याला आणखी दृढ करायची आहे, असल्याचं तटकरेंनी स्पष्ट केलं आहे.
सीबीआयच्या छाप्यानंतर कस्टम अधिकाऱ्याची आत्महत्या, सुसाईड नोट सापडली
राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर आता शरद पवार गटाने आपण इंडिया पक्षासोबतच राहणार असल्याची भूमिका मांडली. त्यानंतर आता राज्यभर शरद पवार दौरा करीत असून पक्षाची पहिलीच स्वाभिमान सभा बीडमध्ये पार पडली. या सभेतून शरद पवारांकडून विरोधकांवर टीकेची तोफ डागली होती. त्यानंतर आज अजित पवार गटाची सभा बीडमध्ये पार पडली असून या सभेसाठी धनंजय मुंडे यांनी मोठं शक्तीप्रदर्शन केल्याचं दिसून आलं आहे.
Hasan Mushrif : उद्धव ठाकरेंना आमदारांनी का सोडलं? मुश्रीफांनी पहिल्यांदाच थेट उत्तर दिलं
या सभेत बोलताना छगन भुजबळांनीही शरद पवार गटावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, सगळीकडे दौरा केल्यानंतर शरद पवार आणि सुप्रिया सुळे म्हणताहेत की अजित पवार आमचे नेते आहेत, मग अजितदादा तुमचे नेते आहेत त्यांना उपमुख्यमंत्री म्हणून मान्यता द्या अन् भांडणं मिटवून टाका, आम्ही इकडे विकासासाठी आलो आहोत. फुले-शाहु-आंबेडकरांचा विचार सोडणार नाही.
तुम्ही काय सांगता काय बोलता हे आम्हाला कळतचं नाही, तुमच्यासोबतच्या सर्व आमदारांना विचारा सर्व आमदारांनी भाजपसोबत सामिल होण्यासाठी सह्या केल्या की नाही? तुम्हीच 2014 पासून ते आत्तापर्यंत अनेकदा सांगितलं अजितदादांना जयंत पाटलांना की, तुम्ही दिल्लीला जायचं आम्हाला एवढी मंत्रीपदे द्या, असं तुम्ही सांगत होते, मग आता काय झालं? असा खोचक सवालही त्यांनी शरद पवार यांना केला आहे.