Download App

संरक्षण बजेटमध्ये वाढ, हत्यारं अन् दारुगोळा खरेदीसाठी 548 अब्ज; पाकिस्तानचा प्लॅन काय?

आर्थिक संकटांनी हैराण आणि कर्जबाजारी झालेल्या पाकिस्तानने संरक्षण बजेटमध्ये वाढ करून 2 हजार 122 अब्ज रुपये केले आहे.

Pakistan Defense Budget : आर्थिक संकटांनी हैराण आणि कर्जबाजारी झालेल्या (Pakistan Defense Budget) पाकिस्तानने 2024-25 या आर्थिक वर्षासाठी संसदेत बजेट सादर केले. यावेळी संरक्षण बजेटमध्ये वाढ करून 2 हजार 122 अब्ज रुपये (Pakistan Budget) करण्यात आले आहे. मागील बजेटच्या तुलनेत यावर्षीच्या बजेटमध्ये वाढ झाली आहे. पाकिस्तानच्या अर्थमंत्री औरंगजेब यांनी बुधवारी संसदेत बजेट सादर करताना याबाबत माहिती दिली. यावेळी शस्त्रास्त्र, दारू गोळा आणि उपकरणे खरेदी करण्यासाठी 548 अब्ज रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पाकिस्तान सरकारने संरक्षणावर जास्त खर्च करण्याचे निश्चित केले असले तरी भारताच्या तुलनेत त्यांचं संरक्षणाचं बजेट खूप मागं आहे.

पाकिस्तानने 2024-25 या वर्षातील अर्थसंकल्पा कर्मचाऱ्यांशी संबंधित खर्चांसाठी 815 अब्ज रुपये, ऑपरेशन खर्चासाठी 513 अब्ज रुपये, दैनंदीन कामकाजासाठी 244 अब्ज, शस्त्रास्त्र, दारगोळा आणि उपकरणांच्या खरेदीसाठी 548 अब्ज रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पाकिस्तानचे मागील वर्षातील संरक्षण बजेट 1854 अब्ज रुपयांचे होते.

Pakistan News : कंगाल पाकिस्तानला गुडन्यूज! ‘आयएमएफ’ने केली मोठ्ठी घोषणा

पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती सध्या अत्यंत खराब झाली आहे. आयएमएफ आणि अन्य देशांकडून कर्ज घेऊन देश चालवावा लागत आहे. मागील महिन्यात पाकिस्तान सरकारने कर्जावरील व्याजाचे पैसे भरले आहेत. यामुळे दिवाळखोर होण्यापासून पाकिस्तान वाचला आहे. अशीच परिस्थिती राहिली तर दिवाळखोर होण्याचा धोका वाढत जाणार असल्याचा इशारा आर्थिक तज्ज्ञांनी दिला आहे.

अलीकडच्या काळात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपया मजबूत झाला आहे. परंतु, त्याचा फायदा देशातील नागरिकांना होताना दिसत नाही. चलन मजबूत झाले तरीही पाकिस्तानला इंधन आयात शुल्क जास्तच द्यावे लागले. पहिल्या सहामाहीत पाकिस्तानी रुपया डॉलरच्या तुलनेत 0.25 वर पोहोचला आहे. म्हणजेच पाकिस्तानमध्ये एका डॉलरची किंमत 280 रुपये झाली आहे. याआधी एका डॉलरची किंमत 281 पाकिस्तानी रुपये इतकी होती.

भारताचं संरक्षण बजेट किती ?

भारताच्या संरक्षण बजेटचा विचार केला तर 2023-24 मध्ये 5.94 ला कोटींचं बजेट होतं. मागील वर्षाच्या तुलनेत यामध्ये 13 टक्क्यांची वाढ केली होती. 1.62 लाख कोटी रुपये फक्त सैन्याच्या आधुनिकीकरणासाठी दिले होते. पेन्शनसाठी 1.38 लाख कोटी रुपये तरतूद केले होते. 2019-20 मधील बजेटची आकडेवारी पाहिली तर देशाचं संरक्षण बजेट 57 टक्क्यांन वाढलं आहे. आता जुलै महिन्यात सादर केल्या जाणाऱ्या संरक्षण अर्थसंकल्पात आणखी वाढ होईल असे अपेक्षित आहे.

Pakistan Team : टीम इंडियाच्या विश्वचषकाचा ‘हिरो’ पाकिस्तानचा हेड कोच; PCB ने केलं कन्फर्म

follow us

वेब स्टोरीज