Pakistan Internal Security Issues In War With India : भारतासोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने (Pakistan Internal Security) सीमेवर आपलं सैन्य तैनात केलंय. परंतु, हे पाऊल पाकिस्तानच्या (Pakistan) अंतर्गत सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत आहे. जमियत उलेमा-ए-इस्लाम-एफच्या प्रमुखांनी चिंता व्यक्त केलीय. सीमेवर सैन्य तैनात केल्यामुळे अंतर्गत सुरक्षा कमकुवत होईल, त्यामुळे गुन्हेगारी आणि दहशतवाद वाढू शकतो. पाकिस्तान आधीच दहशतवाद (Terrorist), गुन्हेगारी आणि बंडखोरीशी झुंजत आहे. भारतासोबत संभाव्य युद्धामुळे परिस्थिती आणखी बिकट (India Pakistan War) होऊ शकते, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे.
पाकिस्तानने भारतीय सीमेवर आपले नौदल, हवाई दल आणि लष्कराची तैनाती वाढवली आहे. कदाचित या तैनातीमुळे पाकिस्तानला भारताकडून होणारे हल्ले टाळण्यास मदत होऊ शकेल, परंतु पाकिस्तानला आणखी एका मोठ्या समस्येचा सामना करावा लागत (India Pakistan Tension) आहे. जर सगळे सैन्य सीमेवर तैनात केले, तर पाकिस्तानच्या आत सुरक्षा कोण करणार? अशी चिंता पाकिस्तानच्या मौलानांनी व्यक्त केली आहे. जमियत उलेमा-ए-इस्लाम-एफ (जेयूआय-एफ) चे प्रमुख आणि माजी गृहमंत्री मौलाना फजलुर रहमान यांनी अंतर्गत सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांनी म्हटलंय की, जर सैन्याने पूर्व सीमेकडे लक्ष दिले तर अंतर्गत सुरक्षेचे रक्षण कोण करणार? या संदर्भातील माहिती संसदेला द्यायला हवी होती.
अहिल्यादेवींच्या चौंडीत राजकीयांची मांदीयाळी; पाहा मंत्र्यांचे काठी अन् घोंगडं घेतलेले खास फोटो
पाकिस्तानमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण खूप जास्त आहे. कराचीसारख्या मोठ्या शहरांमध्ये चोरी आणि छेडछाडीच्या घटना सामान्य आहेत. दुसरीकडे, बलुचिस्तानमधील बंडखोर आणि दहशतवादी पाकिस्तानी सैन्यासमोर आव्हान आहेत. अफगाण-इराण सीमा देखील सुरक्षित नाही. पाकिस्तानमध्ये सुरक्षेच्या चिंता काही आता नव्याने निर्माण झालेल्या नाहीत. तर पाकिस्तान बऱ्याच काळापासून दहशतवाद, गुन्हेगारी आणि बलुच बंडखोरांशी झुंजत आहे.
झेडपी, महापालिका निवडणुकीचं ठरलं पण, ओबीसी आरक्षणाचं काय? सुप्रीम कोर्टाच्या आदेशातच उत्तर
या परिस्थितीत भारतासोबत युद्ध झाल्यास पाकिस्तान मोठ्या संकटात सापडू शकतो. जेव्हा सैन्य भारतासोबत युद्धात व्यस्त असेल, तेव्हा पाकिस्तानमध्ये हा विशिष्ट गट अशांतता निर्माण करू शकतात. त्यामुळे पाकिस्तानमध्ये एक नवीन चिंता निर्माण झाली आहे. जर भारतीय सैन्याने लढाई केली तर खिसेकापू अन् चोरांपासून कोण वाचवणार?
फजलुर रहमान यांनी भारतासोबत युद्धावरील उच्चस्तरीय बैठकीत पंतप्रधान आणि वरिष्ठ नेत्यांच्या सहभागावरही आक्षेप घेतलाय. ते म्हणाले की, एवढ्या महत्त्वाच्या वेळी संपूर्ण मंत्रिमंडळाने सभागृहातून अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला, हे अत्यंत दुर्दैवी आहे.