Cashless Treatment : रस्ते अपघातातील जखमींवर आता देशभरात मोफत उपचार; केंद्राचे आदेश निघाले

Govt Notifies Cashless Treatment Scheme For Road Accident Victims : केंद्र सरकारने आज देशभरातील रस्ते अपघातातील (Accident Victims) पीडितांसाठी कॅशलेस उपचार योजनेसाठी अधिसूचना जारी केली. रस्ते वाहतूक (Road Accident) आणि महामार्ग मंत्रालयाच्या राजपत्र अधिसूचनेनुसार, या योजनेला ‘रस्ते अपघातग्रस्तांसाठी कॅशलेस उपचार योजना 2025’ (Cashless Treatment Scheme) असे नाव देण्यात आले आहे. याअंतर्गत अपघाताच्या तारखेपासून सात दिवसांपर्यंत कोणत्याही सूचीबद्ध रुग्णालयात पीडित रूग्णाला दीड लाख रुपयांपर्यंत कॅशलेस उपचार मिळण्याचा अधिकार आहे.
झेडपी, महापालिका निवडणुकीचं ठरलं पण, ओबीसी आरक्षणाचं काय? सुप्रीम कोर्टाच्या आदेशातच उत्तर
केंद्र सरकारने आज देशभरातील रस्ते अपघातातील बळींसाठी कॅशलेस उपचार देणारी योजना अधिसूचित केली, असे वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या राजपत्रातील अधिसूचनेनुसार, या योजनेअंतर्गत अपघातग्रस्त व्यक्तीला अशा अपघाताच्या तारखेपासून सात दिवसांपर्यंत कोणत्याही नियुक्त रुग्णालयात जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांपर्यंत कॅशलेस उपचार मिळण्यास पात्र असेल.
प्रदुषण करणाऱ्या वाहनांना इंधन बंदी, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
कोणत्याही रस्त्यावर मोटार वाहनाच्या वापरामुळे उद्भवलेल्या रस्ते अपघातात बळी पडलेली कोणत्याही व्यक्तीला या योजनेच्या तरतुदींनुसार कॅशलेस उपचार मिळण्यास पात्र असेल, असे अधिसूचनेत म्हटले आहे. ही योजना 5 मे 2025 पासून लागू झाली आहे.
Govt notifies cashless treatment scheme for road accident victims nationwide: Official order
— Press Trust of India (@PTI_News) May 6, 2025
केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी जानेवारीमध्ये घोषणा केली होती की, सरकार रस्ते अपघातातील पीडितांसाठी एक सुधारित योजना आणेल. या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण (एनएचए) पोलिस, रुग्णालये आणि राज्य आरोग्य एजन्सी यांच्याशी समन्वय साधेल. आजच्या अधिसूचनेनुसार नियुक्त रुग्णालयाव्यतिरिक्त इतर रुग्णालयात या योजनेअंतर्गत उपचार केवळ स्थिरीकरणाच्या उद्देशाने आणि मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद केल्याप्रमाणे असतील, असे पीटीआयने वृत्त दिले आहे.