Paris Olympics 2024 : फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये ऑलिम्पिक (Paris Olympics 2024) स्पर्धेला आजपासून सुरूवात होणार आहे. पॅरीसमध्ये खेळाडू जमले असून सीन नदीवर ऐतिहासिक ऑलिम्पिक सोहळ्याची तयारीही पूर्ण झाली आहे. दरम्यान, ऑलिम्पिक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी पॅरिसमध्ये एक धक्कादायक घटना घडली. फ्रान्सच्या हायस्पीड रेल्वे मार्गांवर हल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे ऑलिम्पिक सुरू होण्यापूर्वी पॅरिसमधील रेल्वे वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे.
अहमदनगरमध्ये ACB ची मोठी कारवाई, महिला मंडळाधिकारी,तलाठी लाचेच्या जाळ्यात
पॅरिसमधील रेल्वे नेटवर्कवर शुक्रवारी हल्ला झाला. पॅरिसच्या वेळेनुसार सकाळी 5:15 पर्यंत, अनेक रेल्वे मार्गांवर तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. फ्रान्सची राष्ट्रीय रेल्वे कंपनी एसएनसीएफने शुक्रवारी सांगितले की, हाय-स्पीड लाईनवर अनेक संशयास्पद हालचाली झाल्या आहेत. मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली. त्यामुळे ऑलिम्पिक स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाच्या दिवशी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान, रेल्वे कंपनी SNCF ने सर्व प्रवाशांना सावधगिरीचा इशारा दिला आहे.
वरळीतील ‘स्पा’मध्ये हत्याकांड; कसा झाला गुरू वाघमारेचा गेम? वाचा Inside स्टोरी..
रेल्वे रुळांचे मोठे नुकसान
रेल्वे रुळांचे मोठे नुकसान झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. रुळांवर जाळपोळ करण्यात आली आहे. या घटनांमुळे रेल्वे रुळांच्या दुरुस्तीच्या कामाला आठवडाभराचा कालावधी लागू शकतो. अधिका-यांनी पुढे सांगितले की, याचा रेल्वे वाहतुकीवर खूप गंभीर परिणाम होईल.
फ्रान्सच्या पश्चिम, उत्तर आणि पूर्वेकडील रेल्वे मार्ग प्रभावित
SNCF ने जाहीर केले की फ्रान्सच्या पश्चिम, उत्तर आणि पूर्वेकडील रेल्वे मार्ग प्रभावित झाले आहेत. पॅरिस ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारंभाच्या काही तास आधी घडलेल्या या घटनांचा फ्रेंच अधिकाऱ्यांनी निषेध केला. एसएनसीएफचे मुख्य कार्यकारी जीन-पियरे फेरांडू म्हणाले की, या घटनेमुळे फ्रान्समधील 800,000 प्रवाशांवर परिणाम झाला.
हल्ल्यानंतर अर्ध्या तासात पॅरिसला जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे विविध स्थानकांवर प्रवासी अडकून पडले आहेत. जवळपास 8 लाख प्रवासी स्थानकांवर अडकून पडल्याची माहिती आहे. तथापि, या घटनांचा ऑलिम्पिक खेळांशी संबंध असल्याचे अद्याप दिसून आलं नाही.
उद्घाटन सोहळा पाहण्यासाठी लाखो प्रेक्षक येणार
पॅरिस ऑलिम्पिक 2024 चा उद्घाटन सोहळा सुमारे 6 लाख प्रेक्षक पाहतील अशी अपेक्षा आहे. उद्घाटन समारंभासाठी 2,22,000 मोफत तिकिटे ठेवण्यात आली आहेत, तर 1,04,000 सशुल्क तिकिटे ठेवण्यात आली आहेत.