वरळीतील ‘स्पा’मध्ये हत्याकांड; कसा झाला गुरू वाघमारेचा गेम? वाचा Inside स्टोरी..
Mumbai News : वरळीतील स्पा सेंटरमध्ये गुरू सिद्धप्पा वाघमारेच्या हत्येने मोठी खळबळ उडाली आहे. वाघमारेला या भागात चुलबूल पांडे या टोपण नावानेही ओळखलं जात होतं. या हत्याकांडात आता रोज नवनवीन खुलासे होऊ लागले असून सुपारी देऊन वाघमारेची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. या हत्येचा तपास करताना पोलिसांना एक खास माहिती मिळाली ती म्हणजे गुरू वाघमारेने त्याच्या पायांवर शत्रू्ंची नावं लिहून ठेवली होती. गुरू वाघमारेला वरळीतील एका स्पा सेंटरमध्ये त्याच्या 21 वर्षीय गर्लफ्रेंडसमोर ठार मारण्यात आले होते.
गुरू वाघमारेचा मृतदेह मुंबईतील सॉफ्ट टच स्पा सेंटरमध्ये मिळून आला. धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या करण्यात आली. त्याच्या शरीरावर सर्वत्र धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुणा आढळून आल्या. त्याची हत्या करण्यासाठी सहा लाख रुपयांची सुपारी देण्यात आल्याची नवी माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी चार संशयितांना अटक केली आहे.
Mumbai Airport : मोठी बातमी, मुंबई विमानतळावर 15 कोटींचे अंमली पदार्थ जप्त
गुरू वाघमारे हा वरळीतील स्पा मध्ये सातत्याने जात होता. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांशी त्याची ओळख होती. काही दिवसांपूर्वी त्याचा वाढदिवस होता. मंगळवारी सायंकाळी तो ज्यावेळी स्पा मध्ये पोहोचला तेव्हा त्याची गर्लफ्रेंड आणि आणखी काही मित्रांनी बर्थडे पार्टीचं प्लॅनिंग केलं होतं. नंतर पार्टी करण्यासाठी सगळ्यांनी सायन जवळील एका बारमध्ये गेले. रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास सगळे पुन्हा स्पामध्ये आले. काही वेळानंतर तिन्ही मित्र निघून गेले फक्त गुरू वाघमारे आणि त्याची मैत्रीण दोघेच येथे होते.
याच दरम्यान दोन अनोळखी हल्लेखोर स्पामध्ये घुसले आणि त्यांनी धारदार शस्त्रांनी गुरू वाघमारेच्या मान आणि बोटांवर वार केले आणि तेथून फरार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना गुरू वाघमारे रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. गुरू वाघमारे हा संबंधित स्पा मालकाला ब्लॅकमेल करत असल्याचा खुलासा पोलिसांनी केला आहे. हेच गुरू वाघमारेच्या हत्येचे कारण असावे असे सांगितले जात आहे. परंतु, अद्याप खात्रीशीर माहिती नाही. या प्रकरणात ज्या संशयितांना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडे पोलीस चौकशी करत आहेत. या चौकशीतून खूनाच्या कारणांचा उलगडा होईल.
Mumbai Police : अभिषेक घोसाळकर हत्येनंतर पोलीस अलर्ट; शस्त्र परवान्यांची होणार तपासणी
गुरू वाघमारे आपण स्वतः माहिती अधिकार कार्यकर्ता असल्याचा दावा करत होता. बुधवारी पहाटे वरळीतील सॉफ्ट टच स्पामध्ये त्याची हत्या करण्यात आली होती. वाघमारेने मंगळवारी त्याच्या गर्लफ्रेंडसोबत एका बारमध्ये वाढदिवस साजरा केला होता. त्याचवेळू दोन हल्लेखोर त्याचा पाठलाग करत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आले आहे.