PM Modi in Russia tells about India Russia Relation: पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाच्या दौऱ्यावर (PM Modi in Russia) आहेत. रशियाची राजधानी मॉस्को शहरात (Moscow) त्यांनी आज भारतीय नागरिकांना संबोधित केले. भारत आणि रशियाची मैत्रीचा उल्लेख करत पीएम मोदींनी (India Russia Relation) रशियात लोकप्रिय ठरलेलं हिंदी चित्रपटातील एक गाणं म्हटलं. प्रसिद्ध अभिनेते राज कपूर (Raj Kapoor) यांच्यावर चित्रित केलेलं ते गाणं होतं. “सिर पे लाल टोपी रुसी” गाण्याचे बोल होते जे आज रशियातील भारतीयांना (Russia) मोदींच्या तोंडून ऐकायला मिळाले.
Mumbai BMW Hit & Run : ‘तो’ बलात्कारी आहे की अतिरेकी? शिरसाटांचं विरोधकांना सणसणीत उत्तर
भारत आणि रशियातील संबंधांचे वर्णन करताना मोदी (PM Narendra Modi) म्हणाले, रशिया शब्द ऐकताच प्रत्येक भारतीयाच्या मनात पहिला शब्द येतो तो म्हणजे भारताच्या सुख दुःखातील सहकारी, भारताचा सर्वाधिक विश्वासू मित्र. रशियात थंडीच्या दिवसात तापमान कितीही मायनस झाले तरी भारत आणि रशियाची मैत्री नेहमीच प्लस मध्ये राहिली आहे. मैत्रीचं नातं म्युच्यूअल ट्रस्ट आणि म्युच्यूअल रिस्पेक्टवर आधारीत आहे.
Lakhat Ek Aamcha Dada ची अभिनेत्री दिशाने सांगितला शूटींगचा ‘तो’ खास किस्सा
पंतप्रधान मोदी म्हणाले, ते गाणं कधीकाळी येथे घराघरात गुणगुणलं जात होतं. सिर पर लाल टोपी रुसी.. फिर भी दिल है हिंदुस्तानी… गाणं आता जुनं झालं तरी या गाण्यातील सेंटीमेंट सदाबहार असेच आहेत.
Babu Movie: ‘बाबू’च्या 25 फूट भव्यदिव्य पोस्टरचं पुण्यात अनावरण
या भाषणात पीएम मोदींनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचं (Vladimir Putin) कौतुक केलं. पुतिन यांनी भारत आणि रशिया यांच्यातील भागीदारी अधिक बळकट करण्यासाठी सातत्याने काम केले. मागील दहा वर्षांत हा माझा सहावा रशिया दौरा आहे. या काळात आम्ही एकमेकांची 17 वेळेस भेट घेतली. या भेटी परस्पर विश्वास आणि आदरभाव वाढविणारी आहे. संघर्षाच्या काळात आमचे विद्यार्थी फसले होते त्यावेळी पुतिन यांनी या विद्यार्थ्यांना भारतात पोहोचण्यासाठी मोठी मदत केली होती. यासाठी मी रशियाच्या नागरिकांचे आणि माझे मित्र पुतिन यांचे मनापासून आभार मानतो.
दरम्यान, भारत आणि रशियातील संबंधांना मजबुती येण्यासाठी हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यामध्ये भारत आणि रशियामध्ये अनेक करार होणार असल्याचं सांगितले जात आहे. यावर चर्चा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, सेमी कण्डक्टर, ग्रीन हायड्रोजन आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा. त्यामुळे जगाच्या विकासात भर पडली असून भारतीय अर्थव्यवस्था जगाच्या अर्थव्यवस्थेत 15 टक्के योगदान देते.