Lakhat Ek Aamcha Dada ची अभिनेत्री दिशाने सांगितला शूटींगचा ‘तो’ खास किस्सा
Marathi Serial Lakhat Ek Aamcha Dada actress Disha Pardeshi : ‘लाखात एक आमचा दादा’ (Lakhat Ek Aamcha Dada) मालिकेत दिशा परदेशी (Disha Pardeshi) ‘तुळजा’ ची भूमिका साकारत आहे. तिच्याशी झालेल्या संवादात तिने आपल्या भूमिकेबद्दल आणि आपल्या खाजगी आयुष्याबद्दल संवाद साधला, “तुळजा एक सुंदर, सुशील डॉक्टर आहे, स्वभावाने प्रामाणिक आणि अभ्यासात अतिशय हुशार आहे. इतर मुलींना ही अभ्यासासाठी प्रोत्साहित करते. तिला वाटतं की मुलगी शिकली तरच तिची प्रगती होईल आणि ती स्वतःच अस्तित्व ह्या जगात निर्माण करू शकेल.
Babu Movie: ‘बाबू’च्या 25 फूट भव्यदिव्य पोस्टरचं पुण्यात अनावरण
यावेळी पुढे बोलताना दिशा म्हणाली की, ही भूमिका माझ्यापर्यंत येण्याचा किस्सा सांगायला आवडेल मला. मागच्या वर्षी मी माझ्या एका मराठी चित्रपटाच्या शूटिंगसाठी स्कॉटलंडला गेले होते. त्याचे नाव होते ‘मुसाफिरा’ चित्रपटाचे प्रोमोशन चालू झाले, चित्रपट प्रदर्शित झाला आणि मला एके दिवशी कॉल आला. कॉलवर विचारले गेले की तुम्ही दिशा परदेशी बोलताय का आणि ‘मुसाफिरा’ चित्रपटात तुम्हीच काम केलं आहे ना आणि तो कौलं होता वज्र प्रॉडक्शन मधून त्यांनी सांगितले की, त्यांची नवीन मालिका येत आहे. जी झी मराठीवर प्रसारित होणार आहे. आम्ही मालिकेच्या हेरॉईनसाठी तुमचा विचार करत आहोत आणि आम्हाला खात्री आहे. की तुम्ही त्या भूमिकेसाठी योग्य आहात. मला ही गोष्ट आणि माझी भूमिका ऐकून खूप वेगळी वाटली, आणि असा सुरु झाला तुळजाचा प्रवास. मला आनंद आहे. की झी मराठी सारख्या इतक्या मोठ्या वाहिनी सोबत मी काम करत आहे आणि त्यांच्या माध्यमातून मी घराघरात पोहचणार आहे.
नितीश आणि माझी खूप छान मैत्री आहे. मालिकेत आमचं एक गोड नातं आहे आणि तुम्हाला ही ते स्क्रीनवर पाहायला मज्जा येईल. नितीश उत्तम कलाकार आहे. आमची छान मैत्री असल्यामुळे एकदम मज्जेत सीन्स शूट होतात. सहकलाकारांसोबत सुद्धा छान ट्युनिंग जमलं आहे. मला खासगी आयुष्यात कोणीही दादा नाही कारण मी माझ्या आई-बाबांची एकुलती एक मुलगी आहे. पण मला चुलतभावंडे आहेत आणि त्यांच्यासोबत माझं नातं खूप प्रेमाचं आहे. मला इथे आवर्जून सांगायला आवडेल की ‘लाखात एक आमचा दादा’ मध्ये जो माझ्या मोठ्या भावाची भूमिका साकारत आहे ज्याचे नाव आहे शत्रू. शत्रू आणि तुळजाच मालिकेत कडवट नातं आहे.
पण खऱ्या आयुष्यात माझं आणि त्याच नातं एका मोठ्या भावा आणि लहान बहिणी सारखं आहे.आमची छान मैत्री ही आहे तो माझी एक लहान बहिणी सारखी ऑफस्क्रीन काळजी घेतो. जेव्हा प्रोमो बाहेर आला त्याच दिवशी मला कळलं की एका सुप्रसिद्ध वृत्तपत्रातर्फे मला २०२४ फेस ऑफ द इयर पुरस्कार जाहीर झाला आहे. ऍक्टिंग क्षेत्रात पहिल्यांदाच मला पुरस्काराने गौरवण्यात येत आहे. ‘लाखात एक आमचा दादा’ मालिका माझ्यासाठी लकी आहे. एकूणच काय तर हे वर्ष माझ्यासाठी खूप लकी ठरलंय. मला ऍक्टिंगच्या क्षेत्रात येऊन तीन- साडेतीन वर्ष झाली. त्या आधी मी एक शास्त्रीय नृत्यांगना होते आणि ह्या ही आधी मी तब्बल १० वर्ष मॉडेलिंग केलं आहे. हळू हळू मॉडेलिंग सुटत गेले आणि ऍक्टिंग कडे कल वाढत गेला. मी शेवटी हेच म्हणेन की ‘लाखात एक आमचा दादा’ आणि तुळजा वर तुमचा आशिर्वाद राहू दे.” असं दिशा म्हणाली.