पुतीनचा अमेरिका-ब्रिटनला इशारा, ‘युक्रेनला शस्त्र पुरवठा केला तर याद राखा’

मॉस्को : गेल्या वर्षापासून रशिया (Russia) आणि युक्रेन (Ukraine) देश युद्धाच्या आगीत होरपळत आहेत. या युद्धाला पाश्चिमात्य देश कारणीभूत आहेत. युद्धासाठी युक्रेनला अमेरिका आणि पाश्चिमात्य देश शस्त्रास्त्र पुरवठा करत असल्याचा आरोप रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांचा आहे. यावरुन नाटो देशांच्या शस्त्रास्त्र पुरवठ्यावर त्यांनी जोरदार टीका केली आहे. युक्रेनला शस्त्र देऊन पाश्चिमात्य देश रशियाला […]

Httpswww.canva.comdesignDAFcJmY7 AA2pbVhvfb_idY9UrtjK05lwviewium=link&utm_source=shareyourdesignpanel (8)

Httpswww.canva.comdesignDAFcJmY7 AA2pbVhvfb_idY9UrtjK05lwviewium=link&utm_source=shareyourdesignpanel (8)

मॉस्को : गेल्या वर्षापासून रशिया (Russia) आणि युक्रेन (Ukraine) देश युद्धाच्या आगीत होरपळत आहेत. या युद्धाला पाश्चिमात्य देश कारणीभूत आहेत. युद्धासाठी युक्रेनला अमेरिका आणि पाश्चिमात्य देश शस्त्रास्त्र पुरवठा करत असल्याचा आरोप रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांचा आहे. यावरुन नाटो देशांच्या शस्त्रास्त्र पुरवठ्यावर त्यांनी जोरदार टीका केली आहे. युक्रेनला शस्त्र देऊन पाश्चिमात्य देश रशियाला पराभूत करू शकत नाहीत, असे पुतीन यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

युक्रेनला बाहेरील देशांकडून शस्त्रे मिळत आहेत. ही चिंतेची बाब असली तरी काही फरक पडत नाही. रशियाकडे प्रत्युत्तर देण्यासाठी अनेक माध्यमे आहेत. रशियाकडे शस्त्रास्त्रांचा साठा आहे, जो अद्याप वापरला गेला नाही. रशियन शस्त्रास्त्र निर्मितीबाबतही त्यांनी पाश्चिमात्य देशांना सल्ला दिला.

पुतिन म्हणाले की धोके निश्चितपणे अस्तित्वात आहेत. जेव्हा आपण ज्या देशाशी संघर्ष करत असतो त्या देशाला जेव्हा शस्त्रे पुरवली जातात तेव्हा ते नेहमीच धोक्याचे असते. युक्रेनला कोणता देश कोणत्या मर्यादेपर्यंत शस्त्रास्त्रांचा पुरवठा करू शकतो हे आम्हाला माहीत आहे, असेही ते म्हणाले.

भाजपाच्या आरोपांना भुजबळांचे उत्तर; म्हणाले, राहुल गांधी आणि ओबीसी समाजाचा..

रशियन राष्ट्राध्यक्षांनी सांगितले की, आमच्या माहितीनुसार, अमेरिका दर महिन्याला सुमारे 14000 ते 15000 शेल्सचे उत्पादन करते. आमच्या अंदाजानुसार, युक्रेनियन सैन्य युद्धात दररोज 5000 शेल वापरते. अशा स्थितीत, किती दिवसांत एवढी डिलिव्हरी होईल आणि युक्रेन किती दिवसांत त्या फेऱ्या मारून युद्ध लढू शकेल. पुतीन यांनी आकडेवारीची उदाहरणे देऊन पाश्चिमात्य देशांच्या शब्द आणि कृतीतील फरक स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला.

‘शरद पवारांची कुठं बी चालते’, ‘त्यांनी उठोबा-बठोबा’.. गुलाबराव पाटलांची टोलेबाजी

त्यांनी सांगितले की रशियन सैन्य उत्पादन खूप वेगाने वाढत आहे. त्याचा वेग इतका जास्त आहे, ज्याची अनेकांना अपेक्षा नव्हती. या काळात रशियन उद्योग तिप्पट अधिक दारुगोळा तयार करेल याकडे त्यांनी लक्ष वेधले. पुतिन म्हणाले की, आम्ही शस्त्रास्त्र पुरवठ्याबाबतच्या दृष्टिकोनाबद्दल चिंतित आहोत की त्यांचा हा संघर्ष लांबवण्याचा प्रयत्न आहे. कोणत्याही परिस्थित शस्त्रास्त्रांचा पुरवठा हा बहुधा योग्य निर्णय नाही. ते म्हणाले की, माझ्या मते ही मोठ्या संकटाचा निर्मिती करणार होईल.

Exit mobile version