भाजपाच्या आरोपांना भुजबळांचे उत्तर; म्हणाले, राहुल गांधी आणि ओबीसी समाजाचा..

भाजपाच्या आरोपांना भुजबळांचे उत्तर; म्हणाले, राहुल गांधी आणि ओबीसी समाजाचा..

Chagan Bhujbal : राहुल गांधी यांची खासदारकी रद्द (Rahul Gandhi Disqualified) करण्याच्या निर्णयावरून देशभरात राजकीय वादळ उठले आहेत. देशातील विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. तर काँग्रेसने आक्रमक होत देशभरात आंदोलने केली आहेत. त्यानंतर आता सोमवारपासून आंदोलने सुरू केली जाणार आहेत. या निर्णयावर राजकीय वर्तुळातून अजूनही प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनीही भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधला आहे.

देवेंद्र फडणवीसांनी सहकार्य केलं नसतं तर… मुख्यमंत्री शिंदेंच्या गौप्यस्फोटाने खळबळ

राहुल गांधी यांनी मोदी आडनावावरून ओबीसी समाजाचा अपमान केल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. यावर भुजबळ म्हणाले, की राहुल गांधी प्रकरण तसेच गौतम अदानी प्रकरण यांचा आणि ओबीसी समाजाचा काडीचाही संबंध नाही. आम्ही सरकारला नेहमीच म्हणत होतो की ओबीसींची जनगणना करा. तुमच्याकडे असलेला इम्पिरिकल डेटा आम्हाला द्या मग पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तो डेटा का दिला नाही ?, मोदी सुद्धा ओबीसीच आहेत ना मग त्यांनी का पाठिंबा दिला नाही असा सवाल भुजबळ यांनी उपस्थित केला.

जे परदेशात पळून गेले ते सगळेच काही ओबीसी नाहीत. मात्र, त्याचा आता संबंध लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसे पाहिले तर ओबीसी आरक्षणाच्या विरोधात बीजेपीचेच लोक न्यायालयात गेले होते. त्यांनी अडचणीत आणण्याचेच काम केले. आता तर देशालाच अडचणीत आणू पाहत आहेत, अशी टीका त्यांनी केली.

सभेला पैसे वाटून आणलेली माणसे शोधाच; भुजबळांनी दिले आव्हान

 

मोदी आडनाव म्हणजे सगळे ओबीसी झाले अस काही नाही. राहुल गांधी कर्नाटकमध्ये बोलले. केस मात्र सूरतमध्ये दाखल केली गेली. आताचा प्रकारही लोकांना आजिबात आवडलेला नाही. त्यामुळे राहुल गांधींना देशभरातून सहानुभूती मिळत आहे. शेवटी जनतेचे न्यायालय हे सर्वात मोठे न्यायालय आहे, असे भुजबळ यांनी सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube