सभेला पैसे वाटून आणलेली माणसे शोधाच; भुजबळांनी दिले आव्हान

सभेला पैसे वाटून आणलेली माणसे शोधाच; भुजबळांनी दिले आव्हान

Nashik :  माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची रत्नागिरी जिल्ह्यातील खेडनंतर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे सभा होत आहे. सभेआधीच राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे राज्यभरात सभा घेत आहेत. या सभांवर राजकीय टीकाटिप्पणीही होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनीही यावर भाष्य केले आहे. ते म्हणाले, की ‘ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नाव काढून घेतले. चिन्ह काढून घेतले. त्यांचे मुख्यमंत्रीपदही काढून घेतले. त्यामुळे त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात प्रचंड सहानुभूती निर्माण झाली आहे. ही सहानुभूती कॅश करण्यासाठीच उद्धव ठाकरे सभा घेत आहेत. फक्त उद्धवर ठाकरचे नाही तर महाविकास आघाडीतील घटक पक्षही सभा, बैठका घेतील.’

हेही वाचा : माझा धाकटा भाऊ असता तर… गोपीनाथ मुंडेच्या आठवणीत छगन भुजबळ झाले भावूक..

शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज मालेगावात जाहीर सभा होणार आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडानंतर मालेगावात ठाकरेंची ही पहिलीच सभा होत आहे. त्यामुळे या सभेकडे राज्याचे लक्ष लागले आहे. या सभेबाबत भुजबळ म्हणाले, ‘सभेसाठी पैसे देऊन माणसे आणली असा आरोप केला जातो तर कोणती माणसे पैसे देऊन आणली आणि कोणती नाही हे आरोप करणाऱ्यांनी शोधून काढावे, असे आव्हान त्यांनी दिले.

उद्धव ठाकरेंवर असे आरोप करणे सोपे आहे. पण प्रत्यक्षात तशी परिस्थिती नाही. उद्धव ठाकरेंना लोकांची प्रचंड सहानुभूती मिळत आहे. त्यासाठीच आता या सभा घेतल्या जात आहेत.’

नाशिकमधील वाढलेल्या गुन्हेगारीवरून त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, ‘मी विधानसभेत देखील मुद्दा उपस्थित केला होता. दर दिवसाआड एक खून होत आहे. नाशिक पोलीस आयुक्तांनी कठोर भूमिका घेऊन हे प्रकार आवरावे लागतील. अन्यथा नाशिकच्या जनतेचा उद्रेक होईल. हे लवकर थांबले नाही तर पोलीस कमिशनर यांच्या विरोधात आम्हाला आवाज उठवावा लागेल,’ असा इशारा भुजबळ यांनी दिला.

मुख्यमंत्रीपदासाठी ठाकरेंनी ‘ही’ दोन नाव सुचवली होती; भुजबळांचा गौप्यस्फोट  

पांजारपोळ किती मोठा विषय हा अभ्यासाचा विषय आहे. मात्र याला मनसेकडून विरोध का होतोय याचे कारण आपल्याला माहित नाही. काही आयटी फर्म आणता येईल का, या संदर्भात काही करता येईल का, हा महत्वाचा प्रश्न आहे. पर्यावरणाचा विषयही महत्वाचा आहे. उड्डाणपूल बांधण्यासाठी झाडे तोडली जात आहेत. कोणाच्या तरी आर्थिक फायद्यासाठी हा प्रकल्प केला जात आहे. मी काही विरोध करत नाही असे ते म्हणाले.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube