माझा धाकटा भाऊ असता तर… गोपीनाथ मुंडेच्या आठवणीत छगन भुजबळ झाले भावूक…
नाशिक : आज नाशिक जिल्ह्यामधील सिन्नर तालुक्यात नांदूर शिंगोटे गावात स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मारकाचे आणि पुतळयाचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमावेळी माजी मंत्री छगन भुजबळ बोलत होते. यावेळी भुजबळ म्हणाले स्व,गोपीनाथराव मुंडे हा माझा धाकटा भाऊ जर असता तर मी अडीचवर्ष जेलमध्ये गेलो नसतो. कारण माझा भाऊ माझ्या पाठीशी पहाडासारखा उभा राहिला असता. राज्यातील जनतेला आजही हा नेता आपल्यात हवा होता, परंतु नियतीच्या पुढे कोणाचं काही चालत नाही. त्यामुळे गोपीनाथरावांनी राज्यात जे काम सुरु केलं ते काम शेवटच्या श्वास पर्यंत मी सुरु ठेवणार आहे. असे म्हणत छगन भुजबळ भावुक झाले .
यावेळी जुन्या आठवणींना उजाळादेत भुजबळ म्हणतात ओबीसींची जनगणना झाली पाहिजे, मंडळ आयोगाची स्थापना झाली पाहिजे, बहुजन समाजाला एकत्र आण्याचे काम गोपनाथराव यांनी केले, त्यामुळे या सर्व समाजाला न्याय देण्याची भूमिका घेणं हीच खरी स्व. गोपीनाथराव यांना श्रद्धांजली ठरेल. गोपीनाथराव जो पर्यंत होते तो पर्यंत त्यांनी फक्त बहुजन समाजासाठी आणि ओबीसी समाजासाठी खूप काही केलं तसेच त्यांनी राज्यातील सर्व जनतेसाठी आयुष्यभर लढा दिला. आता त्यांचे हे काम पुढे सुरु ठेवणे हे माझे काम आहे . असे यावेळी छगन भुजबळ म्हणाले.
Sushma Andhare : सरकारने एसटी ऐवजी गॅसच्या भावात सूट द्यावी, अंधारेंनी सुनावले
यावेळी बोलताना छगन भुजबळ भावुक झाल्याचे पाहायला मिळाले, बाहुबल म्हणतात ज्यावेळी माझा मोठा भाऊ मगण भुजबळ यांचे निधन झाले त्यावेळी मला जेवढे दुःख झाले तेवढेच दुःख मला माझा लागण भाऊ गोपीनाथ मुंडे यांच्या जाण्यानी झाले होते. गोपीनाथराव यांचे अकाली जाणे म्हणजे आपल्यासाठी एक मोठा धक्काच आहे.
गोपीनाथ मुंडे यांनी आपलं संपूर्ण आयुष्य कष्टकरी आणि सामान्य जनतेसाठी वेचलं त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात गोरगरीब, ऊसतोड कामगार, यांच्या प्रश्नासाठी लढा दिला आणि त्यांना न्या मिळून दीला. त्यांचे जे काम अपूर्ण राहिले आहे ते काम आता आपल्या सर्वाना पूर्ण करायचे आहे. अशा भावना यावेळी छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या.