Sushma Andhare : चित्रा वाघांच्या एसटी प्रवासावर अंधारेंचा चिमटा; म्हणाल्या भाजपने…
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे अंबाजोगाई आणि परळीच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान माध्यमांशी साधलेल्या संवादात राज्य सरकारच्या धोरणावर त्यांनी टीका केली आहे. राज्य सरकारने नुकतेच महिलांसाठी एसटीच्या प्रवासात 50 टक्के सूट दिली. मात्र एसटी प्रवासात सूट देण्यापेक्षा बाराशे रुपयांचा सिलेंडर महिलांना चारशे रुपयाला उपलब्ध करून द्यावा, असं मत अंधार यांनी व्यक्त केले.
याआधी आज भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आज एसटीतून प्रवास केला, याची सर्वत्र चर्चा होत आहे. भाजप नेत्यांसाठी विशेष बसची सोय राज्य सरकारने केल्याचं दिसत असल्याचं म्हणत अंधारेंनी या निर्णावर टीका केली आहे. राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे. असे निर्णय की जे पुढील 20-25 वर्षे राज्याच्या जनतेच्या हिताचे असतील. पण सरकराने सवंग लोकप्रियतेसातेसाठी असे निर्णय घेतले असतील तर ते चुकीचे आहे, असे अंधारे म्हणाले आहेत.
Thackeray Vs Shinde : तर उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होवू शकतात; काय आहे त्यामागचं कारण…
राज्य सरकारने जर 1200 रुपयांच्या गॅस सिलेंडरचे दर 400 रुपये केले असते तर तो धोरणात्मक निर्णय झाला असता, असे अंधारे म्हणाल्या आहेत. यावेळी त्यांनी अमृता फडणवीसांना लाच ऑफर करण्याच्या प्रकरणावरुन देखील भाष्य केले आहे. जर देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री असतील तर या प्रकरणाचा तपास निष्पक्ष होऊ शकणार नाही, म्हणून त्यांनी हा तपास पूर्ण होईपर्यंत गृहमंत्री पदावरुन पायउतार व्हावे, असे अंधारे म्हणाल्या आहेत.
https://letsupp.com/maharashtra/if-it-was-my-younger-brother-i-would-not-have-gone-to-jail-chhagan-bhujbal-became-emotional-at-the-memory-of-gopinath-munde-25349.html
अमोल मिटकरींची टीका
एसटी बसमधील चित्रा वाघ यांच्या प्रवासावरुन राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील टीका केली आहे. माझ्या ताईचा साधेपणा बघा. डाव्या हातात महागड्या वस्तु असतानाही महाराष्ट्र सरकारने एसटीचे तिकीट महिलांसाठी 50 टक्के केल्यानंतर ताईंनी एसटी बसने प्रवास करत पक्ष प्रचार करणे ही बाब अद्भुत आहे. ताई खरोखरच एसटीने प्रवास केल्याबद्दल आपणास साष्टांग दंडवत, अशा शब्दात मिटकरींनी वाघ यांच्यावर टीका केली आहे.
माझ्या ताईचा साधेपणा बघा. डाव्या हातात महागड्या वस्तु असतानाही महाराष्ट्र सरकारने एसटीचे तिकीट महिलांसाठी 50 टक्के केल्यानंतर ताईंनी एसटी बसने प्रवास करत पक्ष प्रचार करणे ही बाब अद्भुत आहे.ताई खरोखरच एसटीने प्रवास केल्याबद्दल आपणास साष्टांग दंडवत #माझीताई @ChitraKWagh pic.twitter.com/dxkVOXtQj9
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) March 18, 2023