‘शरद पवारांची कुठं बी चालते’, ‘त्यांनी उठोबा-बठोबा’.. गुलाबराव पाटलांची टोलेबाजी

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (83)

जळगाव : पवार आहेत ना, ते कलाकार आहेत.. आणि शरद पवारांची चावी कुठं बी चालते.. त्यांनी काँग्रेसला पटवले, उठोबा बठोबाचा एक माणूस पटवला, अशी मिसळ तयार झाली अन् हे 11 मते घेऊन पाहुण्यांना पाडून आले, असे वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.ड

गुलाबराव पाटील मिश्कील वक्तव्ये करण्यात पटाईत आहेत. त्यांच्या वक्तव्यांमुळे अनेकदा वादाचे प्रसंगही उभे राहिले आहेत. मात्र ते त्यांची खासियत काही सोडत नाहीत. आताही जळगाव जिल्हा बँकेच्य निवडणुकीतील राजकारणावरून त्यांनी केलेले हे वक्तव्य चांगलेच चर्चेत आहे.

हे सुद्धा वाचा : सट्ट्याने वाढला वाद.. चंद्रकांतदादा म्हणाले, गुलाबराव पाटील यांच्यासारखी माणसं..

जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील चिंचपुरे गावात विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी हे वक्तव्य केले. या वक्तव्यावरूनही आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

पाटील म्हणाले, की शेवटी ते पवार आहेत. शरद पवार कसे चावी देतात. कधी ही चावी दे, तर कधी ती चावी दे. ती चावी कुठं बी चालते. त्यांनी काँग्रेसला पटवले, उठोबा बठोबाचा एक माणूस पटवला. अशी मिसळ तयार झाली अन् हे 11 मते घेऊन पाहुण्यांना पाडून आले. त्यांनी हे वक्तव्य करत शरद पवार यांना टोला लगावला.

.. म्हणून पवारांना आम्ही घाबरतो; गुलाबरावांनी सांगितले भन्नाट कारण, वाचा..

जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि शिवसेनेच्या शिंदे गटाची संयुक्त सत्ता होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे दहा, शिवसेनेच्या शिंदे गटाचे पाच, काँग्रेसचे तीन, शिवसेना ठाकरे गटाचे दोन आणि भारतीय जनता पार्टीचा एक सदस्य आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे शिंदे गटाचे आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांच्याकडे बँकेचे नेतृत्व होते. मात्र, निवडणुकीत शिंदे गटाच्या पाठिंब्यावर संजय पवार विजयी झाले. तर खडसे आणि अजित पवार यांनी उभ्या केलेल्या उमेदवाराचा पराभव झाला.

 

Tags

follow us