सट्ट्याने वाढला वाद.. चंद्रकांतदादा म्हणाले, गुलाबराव पाटील यांच्यासारखी माणसं..

सट्ट्याने वाढला वाद.. चंद्रकांतदादा म्हणाले, गुलाबराव पाटील यांच्यासारखी माणसं..

Chandrakant Patil : राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. त्यांच्या वक्तव्याचे वेगवेगळे अर्थ काढले जात असून विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. यावर आता भाजप (BJP) नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांनी भाष्य केले आहे. रविवारी त्यांना पत्रकारांनी याबाबत प्रश्न विचारला.

पाटील म्हणाले, गुलाबराव पाटील यांच्यासारखी माणसं ग्रामीण भागात वाढली आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात ज्या भाषेत बोलतात त्या भाषेत ते बोलले. शहरी भागात जरा पॉलिश करून बोलतात. जसं की आम्ही रिस्क घेतली. त्या रिस्कला गुलाबराव पाटील आम्ही सट्टा खेळलो असे म्हणाले.

वाचा : आम्ही मंत्रिपदाचा सट्टा लावून घेतला ‘तो’ निर्णय; मंत्री गुलाबराव पाटलांनी सांगितले बंडखोरीचे कारण 

याआधी गुलाबराव पाटील म्हणाले होते, की शिवसेनेतून बाहेर पडण्याआधी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) चुकीच्या मार्गाने जात असल्याचे आम्ही त्यांना सांगितले होते. मात्र, संजय राऊतांनी (Sanjay Raut) आमची खिल्ली उडवत तुम्हाला जायचं असेल तर जा सांगितलं. मग, आम्ही विचार केला ज्या शिवसेनाप्रमुखांनी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी शिवसेना उभी केली. त्या शिवसेनेच्या मागे जायचे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मागे जाण्याचा निर्णय घेतला. अगदी मंत्रिपदाचा सट्टा लावून आम्ही तो निर्णय घेतला.

Sushama Andhare : रामदास कदमांचं बोलणं म्हणजे.अंधारेंनी लगावला टोला

दरम्यान, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनीही आज पुण्यातील पत्रकार परिषदेत मंत्री पाटील यांना फटकारले. त्या म्हणाल्या, की सट्टा लावून गद्दारी केल्याचे पाटील म्हणाले. म्हणजे गद्दारी केली हे तरी ते मान्य करत आहेत. मात्र टपरीवाल्याकडून या शब्दाशिवाय आणखी कोणत्या शब्दाचा वापर होईल काय अपेक्षा ठेवणार, असा सवाल त्यांनी केला.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube