Russia Ukraine War : रशियाने (Russia) पुन्हा एकदा युक्रेनवर (Ukraine) मोठा हवाई हल्ला केला आहे. रशियाने युक्रेनियन पॉवर प्लांटवर (Ukrainian power plant) हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्यामुळे युक्रेनच्या मध्य, पश्चिम आणि दक्षिण भागांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. रशियाच्या या हल्ल्यामुळे तब्बल 10 लाखांहून अधिक लोक बाधित झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मार्च 2024 पासून रशियाने युक्रेनियन पॉवर प्लांटवर हा 11 वा मोठा हल्ला केला आहे. यामुळे युक्रेनची अर्ध्याहून अधिक विद्युत क्षमता नष्ट झाली असल्याची माहिती युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
तर दुसरीकडे युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी सांगितले की, रशियाने गुरुवारच्या हल्ल्यात क्रूझ क्षेपणास्त्रे आणि क्लस्टर बॉम्बचा वापर केला. तर हल्ल्यासाठी आलेल्या 91 रशियन क्षेपणास्त्रांपैकी 79 आणि 35 ड्रोन नष्ट करण्यात आले आहे. असा दावा युक्रेनच्या हवाई दलाने केला आहे.
फेब्रुवारी 2022 पासून सुरू असलेल्या युद्धात, या महिन्यात अमेरिका आणि ब्रिटनने युक्रेनला रशियाच्या अंतर्गत भागावर त्यांच्या क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्याची परवानगी दिली आहे, तर प्रत्युत्तरात रशियाने आपल्या नवीन हायपरसॉनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने हल्ला करून जोरदार प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे.
तसेच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) इशारा देत रशिया कीवच्या पॉलिसी मेकिंग सेंटर्सना टार्गेट करू शकतो. रशियाने युक्रेनमधील 33 महिन्यांहून अधिक काळ युद्धात अद्याप महत्त्वाच्या सरकारी इमारतींना टार्गेट केलेले नाही.
पैशाची मागणी, गाडीत वाद अन् प्रेयसीची हत्या…, पुण्यात धक्कादायक प्रकार उघडकीस
या इमारती पाश्चिमात्य देशांनी पुरवलेल्या हवाई संरक्षण यंत्रणेच्या संरक्षणाखालीही आहेत, पण रशियाचे नवीन ऑर्शनिक हायपरसॉनिक क्षेपणास्त्र रोखण्यास कोणतीही संरक्षण यंत्रणा सक्षम नसल्याचे पुतीन यांनी म्हटले आहे. त्यामुळे लढाईचे क्षेत्र वाढवू नये. असा इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दिला आहे.