मोठी बातमी! रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? ट्रम्प, झेलेन्स्की अन् पुतिन यांच्यात फोनवर चर्चा; काय घडलं..

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्यात फोनवर चर्चा झाली.

Donald Trump And Zelensky

Donald Trump And Zelensky

Russia Ukraine War : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन (Vladimir Putin) आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्यात फोनवर चर्चा झाली. या चर्चेत रशिया युक्रेन यांच्यातील युद्ध (Russia Ukraine War) हाच मुद्दा होता. या चर्चेनंतर दोन्ही देशांतील युद्ध संपुष्टात येईल अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. युक्रेनी राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी या चर्चेला सकारात्मक म्हटले आहे. त्यामुळे तीन वर्षांपासून सुरू असलेले युद्ध समाप्तीच्या दिशेने वाटचाल करू लागले आहे अशी चर्चा सुरू झाली आहे.

झेलेन्स्की यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहीली आहे. शांती मिळवण्यासाठी काय उपाययोजना करता येतील यावर दीर्घकाळ चर्चा केली. एकत्रित काम करण्याची तत्परता आणि युक्रेनच्या क्षमतांवरही चर्चा झाली असे झेलेन्स्की यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

रशिया युक्रेन युद्धात रशियाच्या बाजूने लढणाऱ्या 12 भारतीयांचा मृत्यू तर 16 जण बेपत्ता

यानंतर डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) म्हणाले मी आताच झेलेन्स्की यांच्याशी चर्चा केली. चर्चा सकारात्मक राहिली. राष्ट्रपती पुतिन यांच्या प्रमाणेच त्यांना देखील शांतता हवी आहे. आम्ही युद्धाशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा केली. मुख्य बैठक शुक्रवारी म्यूनिक येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत उपराष्ट्रपती जेडी वेंस आणि राज्य सचिव मार्को रुबियो नेतृत्व करतील. या बैठकीचा परिणाम सकारात्मक असेल असे मला वाटते. या हास्यास्पद युद्धाला थांबवण्याची वेळ आता आली आहे.

ट्रम्प यांच्याशी चर्चा झाल्यानंतर झेलेन्स्की यांनी युएसए ट्रेजरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांची भेट घेतली. अमेरिकेबरोबर आम्ही आमच्या भागीदारीला जास्त महत्व देतो. आमच्या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी त्यांच्याकडून मिळालेल्या पाठिंब्याबद्दल आम्ही आभार मानतो असे झेलेन्स्की म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर दोन्ही देशांतील युद्ध थांबवण्यासाठी पडद्यामागे मोठ्या हालचाली सुरू असल्याचे संकेत मिळाले आहेत.

भारताने आम्हाला पाठिंबा द्यावा, अन् रशियाकडून तेल खरेदी थांबवावी; झेलेन्स्कींची मोदींना साद

तीन वर्षांपासून युद्ध सुरुच

रशिया आणि युक्रेन यांच्यात मागील तीन वर्षांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धात हजारो लोकांचा बळी गेला आहे. शहरे उद्धवस्त झाली आहे. शाळा, रस्ते, दवाखाने जमीनदोस्त झाली आहेत. युद्धाच्या सुरुवातीच्या काही महिन्यांनंतर कोणतीही शांती वार्ता झालेली नाही. फेब्रुवारी 2022 मध्ये रशियाने युक्रेनवर हल्ला केला होता. यानंतर अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यासह पश्चिमी नेत्यांनी पुतिन यांच्याशी कोणतीच चर्चा केली नव्हती. त्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

Exit mobile version