Download App

South Korean Company : मूल जन्माला घाला अन् मिळवा 62 लाख; कंपनीने कर्मचाऱ्यांना दिली खास ऑफर

  • Written By: Last Updated:

South Korean Company : जगभरातील वेगवेगळ्या देशांच्या वेगवेगळ्या समस्या आहेत. कोणी आर्थिक समस्येचा सामना करत आहे. तर कुठे लोकसंख्या वाढीची (Population increase) समस्या भेडसावत आहे. मात्र या दरम्यान देखील काही देश असे आहेत. ज्या ठिकाणी जन्मदराचे प्रमाण कमी असणं ही देखील समस्या आहे. ज्यामध्ये दक्षिण कोरिया या देशाचा समावेश होतो. त्यामुळे या देशांमध्ये जन्मदर वाढवण्यासाठी नवनवीन योजना आणल्या जातात.

मिलिंद देवरांना शिवसेनेकडून राज्यसभेची उमेदवारी : शिंदेंना दिल्लीत मिळणार ‘हुशार’ चेहरा

अशाच प्रकारची योजना दक्षिण कोरियातील Booyoung Group या कन्स्ट्रक्शन कंपनीने (South Korean Company) आणली आहे. जीच्याकडून आपल्या कर्मचाऱ्यांना 2021 नंतर जन्माला येणाऱ्या मुलासाठी शंभर मिलियन वॉन म्हणजे 62.12 लाख रुपये दिले जाणार आहेत. त्याबद्दल कंपनीच्या सीओने सांगितलं की, देशातील घटना जन्मदर वाढवण्यासाठी मदत म्हणून ही योजना आणली गेली आहे.

Shruti Marathe: जणू परीच… श्रुती मराठेच्या निखळ हास्यावर चाहते फिदा

यामध्ये कर्मचारी आणि त्याच्या परिवारातील सदस्यांचा हॉस्पिटलचा खर्च, मुलांचे कॉलेज आणि ट्युशनचा खर्च देखील समाविष्ट आहे. कंपनीचे चेअरमन ली जोंग-क्यून यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, 2021 नंतर जन्माला येणाऱ्या मुलासाठी शंभर मिलियन वोन म्हणजे 62.12 लाख रुपये दिले जाणार आहेत.

यामध्ये या कंपनीतील आतापर्यंत 70 कर्मचारी या योजनेसाठी पात्र ठरले आहेत. ज्यासाठी कंपनीला 7 बिलियन वॉन एवढा खर्च येणार आहे. तसेच यावेळी कंपनीच्या चेअरमनने सांगितले की, भविष्यात देखील ही योजना कंपनीकडून कायम ठेवली जाणार आहे, तर सरकारने अशा प्रकारच्या कर्मचाऱ्यांना जमीन दिली, तर आम्ही तीन मुलांना जन्म देणाऱ्या दांपत्यांना आणि त्यांच्या परिवारांना घर देखील देऊ. कारण दक्षिण कोरिया या देशातील जन्मदर अशाच प्रकारे घडता राहिला. तर पुढील वीस वर्षात देशाचे राष्ट्रीय अस्तित्व धोक्यात येईल. त्यामुळे आम्ही ही योजना सुरू केली आहे.

follow us

संबंधित बातम्या