Download App

अमेरिकेचा नवा ‘स्क्वॉड’! चीनला धक्का, भारतालाही टेन्शन; नवा प्लॅन काय?

अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांनी ऑस्ट्रेलिया, जपान आणि फिलिपिन्सच्या मंत्र्यांबरोबर एक बैठक केली. ज्याला आता स्क्वाड म्हणून संबोधले जाऊ लागले आहे.

Squad vs Quad : चीनच्या कारवायांना शह देण्यासाठी अमेरिकेकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. चीनच्या खोड्यांनी जगभरातील अनेक देश त्रस्त झाले आहेत. दक्षिण चीन समुद्रात युद्धाचा धोका वाढत आहे. त्याचबरोबर अलीकडच्या काळात चीन आणि (China) फिलिपिन्समध्ये तणाव वाढला आहे. अशा परिस्थितीत आता अमेरिकेने अशी खेळी खेळली आहे ज्यामुळे भारताची डोकेदुखी वाढणार आहे. अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांनी ऑस्ट्रेलिया, जपान आणि फिलिपिन्सच्या मंत्र्यांबरोबर एक बैठक केली. ज्याला आता स्क्वाड म्हणून संबोधले जाऊ लागले आहे.

आधी अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान आणि भारत या चार देशांचा मिळून क्वाड समूह होता. चीन विरोधात हा समूह तयार करण्यात आल्याचे सांगितले जात होते. आता मात्र भारताच्या जागी फिलिपिन्सला संधी दिली जाऊ लागल्याने भारताचे महत्त्व कमी होत चालले आहे अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. आता हे कसं झालं तर यामागे भारत रशिया मैत्री कारणीभूत ठरल्याच सांगितलं जात आहे.

भारतातील निवडणुकीत अमेरिकेचा हस्तक्षेपाचा प्रयत्न; रशियाचा खळबळजनक दावा

क्वाड गटात असूनही भारताची रशिया बरोबरच मैत्री आहे. युक्रेनवरील हल्ल्यानंतर अमेरिकेने रशियावर कठोर आर्थिक निर्बंध लादले त्यावेळी भारताने मात्र रशियाकडून मोठ्या प्रमाणावर तेल खरेदी केले होते. भारताच्या विपरीत फिलिपिन्स हा अमेरिकेचा संरक्षण सहकारी देश आहे. अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया प्रमाणेच आता फिलिपिन्स जपान बरोबर सुद्धा एक करार करण्यास तयार आहे.

आता अमेरिकेच्या नेतृत्वातील या गटात सहभागी झाल्यानंतर चीन आणि फिलिपिन्स यांच्यातील संघर्ष आणखी वाढणार आहे. दुसरीकडे क्वाड संघटनेत असतानाही भारताने आपली तटस्थ भूमिका कायम ठेवली आहे. युक्रेन रशिया युद्धातही भारत रशियाच्या विरोधात गेला नाही. या काळात भारताने नेहमीच रशियाला पाठिंबा दिला.

Russia-Ukraine War : रशियाच्या हल्ल्यात युक्रेनचा हॅरि पॉटर कॅसल आगीच्या भक्ष्यस्थानी; 4 जणांचा मृत्यू

अमेरिका सुद्धा वेळोवेळी आपण क्वाड मध्ये नाराज असल्याचे दाखवून देत असतो. मागील वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या बैठकीत सहभागी होण्यास जो बायडन यांनी अखेरच्या क्षणी नकार दिला होता. यामुळे ही बैठक सुद्धा रद्द करावी लागली. यानंतर बायडन यांनी भारताच्या गणतंत्र दिवस परेड कार्यक्रमात सहभागी होण्यास नकार दिला होता. आता तर क्वाडची अशी परिस्थिती आहे की पुढील बैठक घ्यायची याबाबत अजून काहीच निश्चित नाही.

follow us

वेब स्टोरीज