Download App

इंडोनेशियाची राजधानी आता जकार्ता ऐवजी नुसंतारा कारण…

कोट्यावधी रुपये खर्च करुन इंडोनेशिया देश नवीन राजधानी बनवत आहे. ही नवी राजधानी बोर्निओ बेटावर बनवण्यात येत असून नव्या राजधानीचं नाव नुसंतारा असणार आहे. यासंदर्भात इंडोनेशियाच्या एका ज्येष्ठ खासदारांनी अधिकृतपणे स्पष्ट केलं आहे.

Bigg Boss OTT : ‘जनता हैं असली बॉस’, सलमान खानने गायलं बिग बॉस ओटीटीचं अॅंथम सॉन्ग

इंडोनेशियाच्या संसदीय अर्थसंकल्पीय समितीने नवीन राजधानी नुसंताराच्या बांधकामाला गती देण्यासाठी अतिरिक्त 15 ट्रिलियन रुपिया ($1.01 अब्ज) मंजूर केले आहेत. समितीच्या अध्यक्षांनी नुसंताराच्या विकासासाठी सरकार यंदाच्या वर्षी अतिरिक्त 15 ट्रिलियन रुपये खर्च करणार आहेत.

Mira Road Murder : सरस्वतीचा मारेकरी उच्च शिक्षित, HIV पॉझिटिव्ह, तरीही त्याने…

जून (2024) पर्यंत सरकार नुसंताराला पूर्ण राजधानी म्हणून विकसित करणार असून या विकासकामांमुळे राष्ट्रपती पुढील वर्षापर्यंत तिथेच राहू शकतात, असा सरकारचा अंदाज असल्याचं इंडोनेशियातल्या एका ज्येष्ठ खासदाराने स्पष्ट केलं आहे.

नेव्हल डॉकयार्ड स्कूलमध्ये 281 पदांची भरती, आठवी आणि दहावी उत्तीर्णांना संधी

2024 पर्यंत नुसंतारा येथे राष्ट्रपती भवन तयार करण्याची इंडोनेशियाचं नियोजन आहे. राजधानीतील राष्ट्रपती भवनाव्यतिरिक्त मंत्र्यांची कार्यालयेही वेळेआधी सज्ज असावीत, याला सरकारचे प्राधान्य आहे.

इंडोनेशियाची राजधानी जकार्ता आता राजधानी राहणार नसून जकार्ताचा एक तृतीयांश भाग 2050 पर्यंत समुद्रात पूर्णपणे बुडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहराने प्रदूषणाची धोकादायक पातळी गाठली असून या परिस्थितीत नवीन राजधानीत विकासासाठी पर्यावरणाच्या रक्षणाला प्रथम प्राधान्य दिले जाणार असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला.

Tags

follow us