Mira Road Murder : सरस्वतीचा मारेकरी उच्च शिक्षित, HIV पॉझिटिव्ह, तरीही त्याने…
Mira Road Murder : मुंबईतील मीरा रोड परिसरात लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या प्रियकराने प्रेयसीची हत्या करुन मृतहेदाचे तुकडे कुकरमध्ये शिजवले. एवढंच नाहीतर मृतदेहाचे तुकडे कुत्र्याला खाऊ घातल्याची घटना घडली. या घटनेनंतर संपूर्ण देश हादरुन गेला आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मनोज सानेला ताब्यात घेतलं असून आरोपी मनोज साने आणि मृत सरस्वती वैद्य यांच्या संबंधाविषयी नवा खुलासा मनोजने केला आहे.
Gadar2 controversary: रिलीजपूर्वी ‘गदर 2’ अडकला वादात? नेमकं कारण काय घ्या जाणून
मी एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे, आमच्यात कधीही शारिरिक संबंध आले नाहीत, सरस्वती माझ्या मुलीसारखी होती, तिला मी मारलं नसून तिने आत्महत्या केल्याचा दावा आरोपी मनोज सानेने केला आहे. तसेच सरस्वती माझ्या मुलीसारखी होती. सरस्वती वैद्य ही अनाथ मुलगी होती. अहमदनगरच्या जानकीबाई आपटे बालिका आश्रममध्ये तिचं शिक्षण झालं होतं. सरस्वती आणि माझं या आश्रममध्ये येणं-जाणं सुरु होतं, मनोजने सांगितलं आहे.
Afghanistan हादरले! माजी उपराज्यपालांच्या अंत्यविधीत बॉम्बस्फोट; 15 ठार
तसेच मनोज आणि सरस्वतीची एका रेशनच्या दुकानात भेट झाली होती. हत्येनंतर मनोजच्या घराची झडती घेतली त्यावेळी त्याच्याकडे एका इंडस्ट्रियल ट्रेंनिंग इन्स्टिट्यूटचे प्रमाणपत्र आढळून आले. जर मनोज हा एक उच्च शिक्षित तरुण होता तर मग तो एका रेशनच्या दुकानात का नोकरी करीत होता, हा सवाल आता पोलिसांसमोर उपस्थित होत आहे.
दरम्यान, या हत्येनंतर पोलिसांच्या चौकशीत आरोपी मनोज सानेला एचआयव्हीची लागण झाली होती, तो एक सुशिक्षित असूनही एका रेशनच्या दुकानात कमी पगारांत नोकरी करीत होता, त्यासोबतच स्वत:चं घर असूनही तो भाड्याच्या घरात का राहत होता? असे अनेक प्रश्न पोलिसांच्या उभे राहिले आहेत. या प्रकरणी पोलिसांकडूनही अधिक तपास सुरु आहे.
देवेंद्र फडणवीसांचे आणखी एक OSD राजकारणात; सुमित वानखेडेंवर मोठी जबाबदारी
सरस्वतीच्या हत्येनंतर मनोजच्या घरातून दुर्गंधी येत असल्याचा सुगावा पोलिसांना लागल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहचले असता समोर दिसलेली परिस्थिती पाहुन पोलिसही हादरुन गेले. पोलिसांनी मनोजच्या घरात प्रवेश केला तेव्हा घरात हॉलमध्ये त्यांना झाड कापण्यासाठी कटर दिसून आली. त्यानंतर पोलिसांनी बेडरुममध्ये जावून पाहिले. जेव्हा बेडवर काळ्या रंगाच्या रंगाच्या प्लॅस्टिकच्या पिशव्याच पिशव्या दिसल्या.
किचनचा दरवाजा उघडून पाहिल्यावर त्या ठिकाणी तीन बादल्या दिसल्या. त्यात मृतदेहाचे तुकडे होते. चहुबाजूनं रक्तच रक्त दिसत होतं, बेडवर केसचं केस विखूरलेले होते. दुर्गंधी जावी म्हणून घरात मोठ्या प्रमाणात एअर फ्रेशनर होते, हे सर्व पाहून पोलिसही हादरुन गेले. त्यानंतर मनोजला पोलिसांनी ताब्यात घेतलं.
या प्रकारानंतर संपूर्ण देश हादरुन गेला असून पोलिसांकडून आरोपीाल ताब्यात घेण्यात आलं आहे. आरोपी मनोज सानेला न्यायालयात हजर केलं असता त्याला 16 जून पर्यंतची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.