‘द वॉशिंग्टन पोस्ट’ ने शशी थरूर यांच्या मुलासह 300 जणांना कामावरुन काढले; कारण काय?

Ishaan Tharoor : द वॉशिंग्टन पोस्टने मोठा निर्णय घेत जवळपास 300 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले आहे. यामध्ये काँग्रेस खासदार शशी थरुर

Ishaan Tharoor

Ishaan Tharoor

Ishaan Tharoor : द वॉशिंग्टन पोस्टने मोठा निर्णय घेत जवळपास 300 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले आहे. यामध्ये काँग्रेस खासदार शशी थरुर यांचे पुत्र ईशान थरुर आणि दिल्ली ब्युरो चीफ प्रांशु वर्मा यांचा समावेश आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती जेफ बेझोस (Jeff Bezos) यांच्या मालकीच्या द वॉशिंग्टन पोस्टने मीडिया हाऊसची स्थिती आणखी सुधारण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. कामावरुन काढून टाकल्यानंतर ईशान थरुरने एक भाविक पोस्ट एक्सवर शेअर केली आहे.

ईशान थरूर यांची एक्स पोस्ट

काँग्रेस खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) यांचा मुलगा ईशान थरूर (Ishaan Tharoor) यांनी एक्सवरील पोस्टमध्ये रिकाम्या न्यूजरूमचा फोटो शेअर करत लिहिले की, “मला कामावरून काढून टाकल्यापासून बराच काळ लोटला आहे, पण हा एक अद्भुत प्रवास होता. 2017 मध्ये, ‘वर्ल्ड व्ह्यू’ कॉलमद्वारे मला लाखो वाचकांशी संपर्क साधण्याची संधी मिळाली.” जेरुसलेम ब्युरो चीफ गॅरी शिह, इन्व्हेस्टिव्ह रिपोर्टर विल हॉबसन आणि दिल्ली (Pranshu Verma) , बीजिंग, कीव आणि लॅटिन अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय वार्ताहरांनाही कामावरून काढून टाकण्यात आले आहे. “मला अजिबात बरे वाटत नाही, हा खूप वाईट दिवस आहे आणि मी कधीही विसरणार नाही.”

इतर देशांतील पत्रकारांची एक्स पोस्ट

वॉशिंग्टन पोस्टचे (The Washington Post) इन्व्हेस्टिव्ह रिपोर्टर विल हॉबसन यांनी एक्सवर लिहिले. “आज द वॉशिंग्टन पोस्टमधून काढून टाकण्यात आलेल्यांमध्ये मीही आहे. क्रीडा क्षेत्रातील इन्व्हेस्टिव्ह पत्रकार म्हणून माझी 11 वर्षांची कारकीर्द एक स्वप्नवत राहिली आहे.” जेरुसलेम ब्युरो चीफ गॅरी शिह यांनी लिहिले, “द पोस्टसोबत काम करणे हा एक विशेषाधिकार होता.” गेल्या सात वर्षांपासून त्या वृत्तपत्रासाठी जगभर प्रवास करणे हा एक आनंददायी दिवस आहे. हा एक दुःखद दिवस आहे, परंतु मी गेल्या 11 वर्षांपासून खूप आनंद घेतला आहे आणि सर्वांसोबत खूप मजा केली आहे.

कारण काय?

वॉशिंग्टन पोस्टने मोठा निर्णय घेत आंतरराष्ट्रीय आणि क्रीडा डेस्कवरील कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले आहे. कंपनीने आता स्पोर्टस् डेस्क पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तर आंतरराष्ट्रीय रिपोर्टिंग देखील कमी करण्याचा निर्णय घेतल्याने कंपनीने अनेक कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक; मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी ‘मताधिकार’ मोबाईल ॲप

वॉशिंग्टन पोस्टने म्हटले आहे की भविष्यासाठी निर्णायक कारवाई आवश्यक आहे, ज्यामुळे कामावरून काढून टाकण्यात आले. मीडिया हाऊसची स्थिती आणखी सुधारण्यासाठी आणि कंपनीसाठी एक नवीन ओळख स्थापित करण्यासाठी ही कामावरून काढून टाकण्यात आली.

Exit mobile version