Download App

तीन व्यक्ती अन् एक विचारसणी; जगाची ‘इकोनॉमी’ हादरून टाकणारे आर्थिक सल्लागार

  • Written By: Last Updated:

Three Advisors Behind Trumps Tariff Decision : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trumps) यांनी टॅरिफची घोषणा केल्यानंतर संपूर्ण जगातील अर्थ व्यवस्था हादरून गेली आहे. त्यानंतर आता जगभारतील अनेक देशांवर टॅरिफ लादणाऱ्या ट्रम्प यांनी चीन वगळता अन्य देशांवर लादलेला टॅरिफ चा निर्णय 90 दिवसांसाठी स्थगित केला आहे. पण अशा प्रकारे टॅरिफ लादण्यचा सल्ला देण्यामागे तीन व्यक्ती आणि त्यांची असलेली एक विचारसरणी असल्याचे बोलले जात असून, संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था हादरूण टाकणाऱ्या या तीन व्यक्ती नेमक्या कोण हे जाणून घेऊया…

डोनाल्ड ट्रम्प अन् एलन मस्क यांच्याविरोधात हजारो नागरिक रस्त्यावर; कारणही धक्कादायक..

तीन अर्थतज्ज्ञांनी आखली टॅरिफची रूपरेषा

ट्रम्प यांना टॅरिफ प्लॅन तयार करण्यात आर्थिक सल्लागार परिषदेने मोठी भूमिका बजावली आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्या तीन आर्थिक सल्लागारांनी संपूर्ण जगाच्या आर्थिक व्यवस्थेला हादरवून टाकणाऱ्या टॅरिफची रूपरेषा तयार केली होती अशी चर्चा आता होऊ लागली आहे. आर्थिक सल्लागार परिषद ही राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयातील एक संस्था आहे, जी १९४६ च्या रोजगार कायद्यात काँग्रेसने तयार केली आहे. ज्यांचे काम राष्ट्राध्यक्षांना देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय आर्थिक धोरणे बनवण्यासाठी आर्थिक सल्ला देणे आहे.

अख्खा देशच इंटरनेटवर पडीक, ‘या’ देशात 99 टक्के लोकांना इंटरनेटचं वेड; भारताचा नंबर कितवा?

जगाची इकोनॉमी हादरवणारे ते तीन कोण?

टॅरिफची रूपरेषा आखून ती लादण्यासाठी ट्रम्प यांना मदत करणाऱ्यांमध्ये तीन व्यक्तींचा समावेश आहे. यात आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष स्टीफन मिरन आणि पियरे यारेड आणि किम रुहल या तिघांची मुख्य भूमिका असल्याचे सांगितले जात आहे. हे अधिकारी आर्थिक परिस्थितीचे विश्लेषण करतात आणि त्यांच्या शिफारसी राष्ट्राध्यक्षांना पाठवतात. एवढेच नव्हे तर, ट्रम्प यांना या तिघांवर पूर्ण विश्वास आहे त्यामुळे देशांतर्गत याला विरोध असतानाही ट्रम्प या तीन व्यक्तींनी सूचविलेल्या सल्ल्यांचे तंतोतंत पालन करतात.

समुद्राच्या पोटातून ‘मुंबई टू दुबई’ प्रवास; खळखळतं पाणी अन् ताशी 1000 किमीचा वेग; वाचा कसा असणार खास प्रोजेक्ट

एकच विचार सरणी असलेल्या अर्थज्ज्ञांची कुंडली

स्टीफन मिरन यांनी २००५ मध्ये बोस्टन विद्यापीठातून अर्थशास्त्र, तत्वज्ञान आणि गणित या विषयांमध्ये पदवी प्राप्त केली आहे. २०१० मध्ये त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात पीएचडी मिळवली, जिथे ते प्रसिद्ध अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ मार्टिन फेल्डस्टाईन यांचे विद्यार्थी होते. १९८० च्या दशकात अमेरिकेचे अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांच्या प्रशासनात त्यांनी सीईएचे नेतृत्व केले आहे.

घरबसल्या फक्त 10 मिनिटांत एक कोटींचं कर्ज; मुकेश अंबानींच्या ‘जिओ’ची खास स्कीम

पियरे यारेड आणि किम रुहल

पियरे यारेड आणि किम रुहल हे आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य आहेत. पियरे यारेड हे एमयूटीबीमध्ये आंतरराष्ट्रीय व्यवसायाचे प्राध्यापक आणि कोलंबिया बिझनेस स्कूलमध्ये वरिष्ठ उपाध्यक्ष आहेत. तर, किम रुहल हे विस्कॉन्सिन विद्यापीठात आणि मॅडिसन येथे प्राध्यापक आहेत आणि आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्या म्हणून राष्ट्राध्यक्षांना सल्ला देतात.

 

follow us