Ukraine Russia War : जागतिक राजकारणावर मोठा परिणाम करणाऱ्या रशिया युक्रेन युद्धाला आज दोन वर्षे पूर्ण होत आहेत. 24 फेब्रुवारी 2022 रोजी रशियाने युक्रेनवर हल्ल्यांना सुरुवात केली होती. युक्रेनच्या राजधानीवर ताबा मिळवून झेलेन्स्कींची सत्ता उलथवून टाकण्याचा रशियाचा प्रयत्न होता. यासाठी रशियाने लाखोंचे सैन्य उभे केले. क्षेपणास्त्रांचा तुफान मारा केला. या हल्ल्याात यु्क्रेनमधील अनेक शहरे उद्धवस्त झाली. आज या विनाशकारी युद्धाला दोन वर्षे पूर्ण होत आहेत तरी देखील रशियाला युक्रेनचा घास घेता आलेला नाही.
युद्धाचे जागतिक राजकारणावर मोठे परिणाम झाले असले तरी युद्धामध्ये लाखो सैनिकांना मृत्यूला सामोरं जावं लागत. या युद्धात रशियाचे दोन लाख आणि युक्रेनचे एक लाखांपेक्षा जास्त सैनिक मारले गेले असतील किंवा जखमी झाले असतील, असे पाश्चात्य देशांच्या अधिकाऱ्यांचे मत आहे. पण युक्रेनने कधीही आपल्या सैनिकांच्या मृत्यूची संख्या जाहीर केली नाही. संयुक्त राष्ट्रसंघाने सांगितले की या युद्धात युक्रेनमध्ये साडेदहा हजार लोकांचा बळी गेला आहे. हजारो लोक जखमी झाले आहेत. शाळा, दवाखाने आणि अन्य पायाभूत सुविधा उद्धवस्त झाल्या आहेत. कडाक्याच्या थंडीत अनेक ठिकामी वीजपुरवठा खंडित झाला आहे.
Ukraine Russia War : एक वर्ष पूर्ण, लाखो लोकांना फटका, किती जीव गमावले?
64 लाख निर्वासित, 10 हजार लोकांचा मृत्यू
जवळपास 40 लाख लोकांना त्यांचे घर सोडून निर्वासितांचे आयुष्य जगावे लागत आहे. रशियातही यु्क्रेनने केलेल्या हल्ल्यात तेथील नागरिक संकटांचा सामना करत आहेत. 23 फेब्रुवारी रोजी संयुक्त राष्ट्राने या युद्धात सामान्य नागरिकांच्या नुकसानीची आकडेवारी शेअर केली होती. या आकडेवारीवर नजर टाकली तर युरोपातील विभिन्न देशांत शरण घेतलेल्या युक्रेनियन नागरिकांची संख्या 6 लाख 4 हजार 100 इतकी झाली आहे. युरोप व्यतिरिक्त अन्य देशांत शरण घेतलेल्या युक्रेनियन नागरिकांची संख्या 4 लाख 75 हजार 600 इतकी आहे. जगभरात युक्रेनच्या आश्रितांची संख्या 64 लाख 79 हजार 700 इतकी झाली आहे.
दोन वर्षात युक्रेनवर 47 हजार हल्ले
जानेवारी ते डिसेंबर 2023 या काळात युक्रेनवर 47 हजार 300 हल्ले झाले आहेत. या हल्ल्यांत जवळपास 13 टक्के शैक्षणिक संस्था उद्धवस्त झाल्या आहेत. 256 दवाखाने नष्ट झाले आहेत. तसेच 7 लाख 19 हजार लोकांना घरे मिळालेली नाहीत. या लोकांची घरांसाठी शोधाशोध सुरू आहे. मात्र युद्धामुळे शहरेच उद्धवस्त झाली आहेत. त्यांच्या पुनर्निर्माणासाठी आणखी काही काळ लागणार आहे.
रशियाच्या सीमेवर नाटोच्या तोफा अन् सैन्य; युक्रेनच्या मित्र देशांचं नक्की प्लॅनिंग काय?
दोन वर्षांपूर्वी झाली होती सुरुवात
आज दोन वर्षांआधी पुतिन यांच्या घोषणेनंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनीही टीव्हीवर येऊन जनतेला संबोधित केले होते. पुतिन यांनी युद्ध घोषित केले तेव्हा युक्रेनचा काही दिवसांत पराभव होईल असे वाटत होते पण या युद्धाला आज दोन वर्षे पूर्ण झाली. या दोन वर्षांत कोणीही जिंकले नाही. कोणीही हरले नाही फक्त शहरामागून शहरे उद्ध्वस्त झाली आहेत. हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. जे वाचले आहेत ते निर्वासित म्हणून आपले जीवन व्यतीत करत आहेत. रशिया मागे हटण्यास तयार नाही. युक्रेन देखील युद्धाचा सामना करत आहे. या युद्धाचा जागतिक अर्थव्यवस्थेवरही खोलवर परिणाम झाला आहे.