US Texas Floods Rescue Operation : मुसळधार पावसामुळे अमेरिकेतील (America) टेक्सास राज्याच्या दक्षिण-मध्य भागातील केर काउंटीमध्ये मोठा विध्वंस झाला आहे. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत 50 जणांचा मृत्यू झाला आहे. छावणीतील 27 मुलींसह अनेक लोक जखमी झाले आहेत. लोकांना वाचवण्यासाठी प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरू (Heavy Rain) आहे. बेपत्ता लोकांची संख्या अद्याप अधिकाऱ्यांनी जाहीर केलेली नाही.
अचानक आलेल्या पुरामुळे केर काउंटीमध्ये शेकडो झाडे (Texas Floods) उन्मळून पडली, वाहने उलटली आणि अनेक इमारतींचेही नुकसान झाले. सर्वत्र चिखल दिसत आहे. चिखलाने भरलेल्या भागात बचाव पथके सतत (Rescue Operation) शोध घेत आहेत.
राज्यात पुन्हा पावसाचा जोर! पुढील 5 दिवसांसाठी हाय अलर्ट, हवामान विभागाचा इशारा
वाहने आणि घरे वाहून गेली
जेव्हा हा अचानक पूर आला तेव्हा त्या भागात ‘कॅम्प मिस्टिक’ नावाचा ख्रिश्चन उन्हाळी शिबिर आयोजित केला जात होता. त्यात अनेक मुलींनी भाग घेतला होता. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या 27 मुली अजूनही बेपत्ता आहेत. 8 मीटर उंच लाटांनी घरे आणि वाहने वाहून गेलीमुसळधार पावसामुळे ग्वाडालुपे नदी फुगली. नदीची पाण्याची पातळी सुमारे 26 फूट वाढली, ज्यामुळे अनेक वाहने आणि घरे वाहून गेली. हवामान अद्याप शांत होताना दिसत नाही. पाऊस अजूनही सुरूच आहे. सॅन अँटोनियोच्या आसपासच्या भागात अचानक पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
Ashadhi Ekadashi 2025 : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा, पाहा PHOTO
शतकातून एकदा येणारा
हेलिकॉप्टर आणि ड्रोनद्वारे मदतकार्यबचाव कार्यात, बेपत्ता लोकांना शोधण्यासाठी हेलिकॉप्टर, ड्रोन आणि बोटींचा वापर केला जात आहे. झाडे आणि लहान बेटांवरूनही लोक सापडल्याचे वृत्त आहे. अधिकाऱ्यांच्या मते, आतापर्यंत 850 हून अधिक बेपत्ता लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे. अमेरिकन काँग्रेस सदस्य चिप रॉय यांनी म्हटले आहे की, केर काउंटीमधील अचानक येणारा पूर हा ‘शतकातून एकदा येणारा’ पूर आहे. अशा आपत्तींमुळे अनेकदा दोषारोपांचा खेळ सुरू होतो.