तब्बल 111 वर्षांपासून समुद्रात पडून असलेलं टायटॅनिक जहाजाला समुद्रातून बाहेर काढण्यासाठी अनेकदा प्रयत्न झाले आहेत. परंतू जहाज बाहेर काढण्यासाठी वैज्ञानिकांनी केलेले प्रयत्न फेल ठरले आहेत. वैज्ञानिकांनी आत्तापर्यंत कोणते प्रयत्न केले आहेत. जहाज बाहेर न येण्याची कारणे कोणती आहेत. हे आपण सविस्तर जाणून घेऊयात.
‘…ते कृत्य डोक्यात गेले’, विनेश फोगटने योगेश्वर दत्त आणि बृजभूषण सिंगवर ओढले ताशेरे
अटलांटिक महासागरात 15 एप्रिल 1912 रोजी एका हिमनगाशी धडकल्याने टायटॅनिक जहाज महासागरात बुडाल्याचं सांगितलं जातं. या अपघातामध्ये अनेकांनी आपली जीव गमवला होता. त्यावेळी टायटॅनिक जहाजाला समुद्रातून बाहेर काढण्याबाबत वैज्ञानिकांचा विचार नव्हता मात्र, तब्बल 73 वर्षांनंतर 1985 साली जहाजाचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला. अमेरिकेचे नेवी अधिकारी रॉबर्ट बैलर्ड आपल्या टीमसोबत जहाजाचा शोध घेण्यास रवाना झाले होते.
Patna Opposition Parties Meeting : विरोधकांचे मिशन 2024! पण, राऊतांनी व्यक्त केली वेगळीच ‘भीती’
समुद्रात या जहाजाचा शोध घेतल्यानंतर जगाला आश्चर्यचकित करणारं चित्र समोर आलं. हे जहाज समुद्रात जवळपास 12 हजार फूट खोलीमध्ये बुडालेले असून जहाज बुडाल्यानंतर त्याचे दोन तुकडे झाल्याचं समोर आलं, काही रिपोर्टनूसार हे जहाज हिमनगाशी नाहीतर तर जहाजाला आग लागल्याने समुद्रात बुडाले होते. वैज्ञानिकांनी जहाजाची अवस्था पाहिल्यानंतर जहाजाला बाहेर काढणं अशक्य असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.
कृषी कर्ज मित्र योजना 2023 चा लाभ कोणाला मिळणार?
त्यानंतर काही वैज्ञानिकांनी पिंग-पोंग बॉलच्या मदतीने जहाजाला बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. समुद्रात असलेल्या टायटॅनिक जहाजात पिंग-पोंग बॉल भरुन हा बॉल जहाजाला वरती आणण्यात यश येईल, मात्र, वैज्ञानिकांचा हा प्लॅनही फेल ठरला होता. कारण पिंग-पोंग बॉल समुद्रात गेल्यानंतर फुटणार असल्याचं भाकीत वैज्ञानिकांनी वर्तवलं होतं. त्यानंतर मोठ-मोठ्या फुग्यांमध्ये हेलियम गॅस भरुन जहाज वर येईल, असा अंदाज वैज्ञानिकांनी लावला पण समुद्रात जाऊन फुग्यांमध्ये गॅस भरणे अशक्य असल्याचं वैज्ञानिकांनी स्पष्ट केलं होतं.
दोषारोपपत्र मागे घेण्यासाठी पंकजा मुंडेंची खंडपीठात धाव, नेमकं प्रकरणं तरी काय?
वैज्ञानिकांचे अनेक प्लॅन फेल ठरल्यानंतर बर्फाचं वजन पाण्यात अधिक प्रमाणात असतं. त्यामुळे बर्फ हा पाण्यात तरंगणार असल्याचा अंदाज बांधण्यात आला होता. मात्र, तोही फेल ठरला होता. त्यानंतर अनेक कंपन्यांनी समुद्राच्या खोल पाण्यातून टायटॅनिक जहाजाला बाहेर काढण्यासाठी अनेक प्लॅन सांगितले पण तेही फेल ठरल्याने अद्याप हे जहाज अंटलांटिक महासागरातच पडून आहे.
दरम्यान, आत्तापर्यंत अनेक प्रयत्न करुनही हे जहाज समुद्रातून बाहेर काढण्यात जगभरातील कोणत्याही वैज्ञानिकाला यश आलेले नाही. 111 वर्षांत या जहाजाची पाण्यात असल्याने झीज होत असल्याचा अहवाल एका वृत्तसंस्थेने दिला आहे.