कृषी कर्ज मित्र योजना 2023 चा लाभ कोणाला मिळणार?

कृषी कर्ज मित्र योजना 2023 चा लाभ कोणाला मिळणार?

LetsUpp l Govt.Schemes
शेतकऱ्यांना (Farmers)कृषी कर्जाची (Agricultural Loans)उपलब्धता सहजतेने आणि कमीत कमी वेळेत करुन देणे आणि याद्वारे भांडवलाची गुंतवणूक (Investment of capital)वाढवून कृषी क्षेत्राचा विकास करणे(Develop the agricultural sector), शेतकऱ्यांना कमीत-कमी व्याजदरात विनाविलंब कर्ज उपलब्ध करुन देणे, सावकाराच्या जास्त व्याजाच्या कर्जापासून शेतकऱ्यांची सुटका करण्याच्या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत आहे. (govt-schemes-krishi-karj-mitra-yojana-2023)

भावाच्या सर्व इच्छा पूर्ण होवो; अजितदादांच्या मागणीला सुप्रियाताईंचे समर्थन

योजनेचे स्वरुप काय?
दरवर्षी खरिप आणि रब्बी हंगामामध्ये शेतकरी पीक कर्ज घेत असतात.लागवडीखालील क्षेत्र व एकूण पीक कर्ज वाटप पाहिले असता, यात विषमता आढळून येते. कृषी क्षेत्रात भांडवलाचा ओघ व गुंतवणूक वाढवून कृषी क्षेत्राच्या विकासात भर पाडणे आवश्यक आहे. निरीक्षण केल्यास तेच तेच लाभार्थी वेगवेगळ्या बाबींसाठी कर्ज घेत असल्याचे दिसून येते. त्यामुळे त्यांच्या शेती क्षेत्रात विकास झालेला दिसून येतो. त्यामुळे त्यांच्या शेती क्षेत्रात विकास झालेला दिसून येतो. या व्यतिरिक्त शेतकरी ज्यांना कर्ज घेण्याची इच्छा आहे, मात्र या कर्जाच्या प्रक्रियेचे ज्ञान नसल्यामुळे आणि वेळेच्या अभावामुळे त्यांना कर्ज मिळणे शक्य होत नाही.

Nana Patole : दाढीवाल्या बाबांचा कार्यक्रम होणार; नाना पटोलेंनी मुख्यमंत्री शिंदेंना डिवचलं

अशा इच्छुक आणि पात्र शेतकऱ्यांना कृषी कर्ज सहज सुलभतेने त्यांच्या मागणीनुसार वेळेत उपलब्ध होण्यासाठी त्यांना प्रशिक्षित स्वयंसेवकाची मदत देणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन कृषी कर्ज मित्र यांच्या मदतीने गरजू आणि पात्र शेतकऱ्यांस ज्या बाबीसाठीचे कर्ज मिळवून देणे आवश्यक आहे. अशी प्रकरणे कृषी कर्ज मित्र यांच्या सहाय्याने तयार करुन दिल्यास, शेतकऱ्यांना वेळेत कर्ज उपलब्ध होईल.

सेवाशुल्काचा दर किती?
– अ. अल्प मुदतीचे कर्ज
– प्रथमतः पीक कर्ज घेणारा
– पहिल्यांदाच पीक कर्ज घेणारा शेतरी असेल तर त्याला प्रति प्रकरण सेवाशुल्क 150 रुपये आकारला जाईल.

– ब. मध्यम व दीर्घ मुदतीचे कर्ज घेणारा
– नवीन कर्ज प्रकरण असेल तर त्यासाठी शेतकऱ्याला प्रति प्रकरण 250 रुपये सेवा शुल्क आकारण्यात येईल.
– कर्ज प्रकरणाचे नुतनीकरण करावयाचे असल्यास शेतकऱ्याला प्रति प्रकरणाचे 200 रुपये सेवाशुल्क भरावा लागेल.

नोंदणी कशी करायची?
– कृषी कर्ज मित्र म्हणून सेवा देऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीने जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर कृषिकर्ज मित्र नोंदणी करायची आहे.
– नोंदणी झालेल्या इच्छुक व्यक्तीची यादी तयार करुन त्यास कृषी समितीची मान्यता घेण्यात येईल.
– जिल्हा परिषदेकडील कृषी समिती अंतिम निवडीचे अधिकार असतील.

कृषी मित्राची कामे कोणती?
– कृषी कर्ज मित्राने ज्या शेतकऱ्यांना कृषी कर्जाची आवश्यकता आहे, त्यांना भेटी देऊन कर्ज प्रकरणाच्या कार्यपद्धतीची सविस्तर माहिती द्यावी लागेल.
– कर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे गोळा करुन शेतकऱ्यांच्या संमतीने कर्ज प्रकरण तयार करुन मंजुरीसाठी बॅंकेमध्ये सादर करतील.
– कृषी कर्ज मित्र हा बँक व शेतरी या दोघांमधील मध्यस्थांच्या भूमिकेऐवजी सहाय्यक आणि सल्लागार यांची भूमिका बजावेल.
– प्रामाणिकपणे व पारदर्शीपणे शेतकऱ्यास सल्ला देणे आणि सहाय्य करणे याविषयीचे बंद पत्र देणे आवश्यक राहील.

योजनेचा कालावधी किती?
– सदर योजनेचा कालावधी हा सन 2021-22 हे आर्थिक वर्ष राहील.
– आवश्यकतेनुसार योजनेचा कालावधी वाढवणे किंवा कमी करणे याचे अधिकार जिल्हा परिषदेला राहतील.

निधीचा स्त्रोत व रक्कम :
जिल्हा परिषद स्वनिधी 2021-22 च्या अंदाजपत्रकानुसार कृषी खर्चाची मर्यादा 10 लाख रुपयांपर्यंत निश्चित केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube