Thailand Cambodia Conflict : दोन आशियाई देश हजारो वर्षे जुन्या शिवमंदिरावरून भिडले (Thailand Cambodia Conflict) आहेत. नाही हे शिवमंदिर भारतात नाही तर थायलंड आणि कंबोडियाच्या सीमेवर आहे. थायलंड आणि कंबोडिया हे दोन्ही देश बऱ्याच काळापासून या मंदिरासाठी कायदेशीर लढाई लढत आहेत ज्यामध्ये कंबोडियाने दोनदा विजय मिळवला आहे. परंतु तरीही हा वाद काही केल्या संपत नाही.
काल थायलंडने F16 लढाऊ विमानांनी कंबोडियाच्या लष्करी तळांवर हल्ला केला. या युद्धात आतापर्यंत 40 हजारांहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत आणि 40 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. आता या मंदिराचा मुद्दा धार्मिक नाही तर दोन देशांमधील युद्धाचं कारण बनला आहे. भारतापासून हजारो किलोमीटर अंतरावर कंबोडियामध्ये असलेल्या या भव्य आणि दिव्य शिव मंदिराबद्दल काही विशेष गोष्टी जाणून घ्या.
भगवान शंकराला समर्पित (Lord Shiva) या मंदिराचे नाव प्रीह विहियर मंदिर आहे. हे मंदिर कंबोडिया आणि थायलंडच्या (Thailand) सीमेवरील एका उंच टेकडीच्या माथ्यावर बांधले आहे. हे मंदिर ऐतिहासिक आहे. मंदिराचा समावेश युनेस्कोच्या (UNESCO) जागतिक वारसा स्थळांच्या यादीत करण्यात आला आहे.
विदेशात राहण्यासाठी सरकार देतंय मोफत घर अन् पैसा; जाणून घ्या ऑफर नेमकी काय?
प्रीह विहियर मंदिर एक हजार वर्षांपूर्वी खामेर साम्राज्याच्या काळात बांधले गेले होते. या काळात तेथील संस्कृतीवर सनातन धर्माचा प्रभाव होता. पर्वताच्या उंच शिखरावर बांधलेले हे मंदिर खूपच आकर्षक दिसते. आजूबाजूला सुंदर नैसर्गिक दृश्ये आहेत. मंदिर बांधण्यासाठी स्थापत्यकलेचा अद्भूत वापर करण्यात आला आहे. मंदिरातील दगडांमध्ये त्या काळातील शिल्पकला दिसून येते.
कंबोडियातील हे एक ऐतिहासिक शिव मंदिर आहे की जे भारतीय संस्कृती (Indian Culture) आणि स्थापत्यकलेचे जिवंत उदाहरण आहे. हे मंदिर पूर्णपणे भगवान शिवाला समर्पित आहे, जिथे शिवलिंग, नंदी आणि शिवाशी संबंधित इतर गोष्टी ठळकपणे दिसतात. यावरून कळते की त्या काळात शिवभक्ती किती खोल आणि व्यापक होती.
भारतापासून दूर असूनही हे मंदिर भारतीय मंदिरांची अनुभूती देते. त्याची रचना आणि शिल्पकला कंबोडियामध्ये भारतीय संस्कृतीचा प्रभाव किती खोलवर होता हे स्पष्ट करते. नवव्या ते बाराव्या शतकादरम्यान बांधलेले हे मंदिर हिंदू धर्माचे पालन करणाऱ्या खामेर साम्राज्याच्या राजांनी बांधले होते. 2008 मध्ये या मंदिराला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आला, ज्यामुळे त्याची जागतिक ओळख आणखी मजबूत झाली. आता ते जगभरातील पर्यटकांना आकर्षित करते. हे मंदिर सुमारे 525 मीटर उंच टेकडीवर वसलेले आहे.
पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर? तिजोरीत भीषण खडखडाट, 23 अब्ज डॉलर्सचं कर्ज न फेडल्यास…
पूर्वेकडून पश्चिमेकडे पसरलेल्या या मंदिरात पाच पातळ्यांवर इमारती बांधल्या आहेत ज्या खामेर स्थापत्यकलेची अतुलनीय कला प्रदर्शित करतात. हे मंदिर नैसर्गिक सौंदर्याने वेढलेले आहे आणि ट्रेकिंग प्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र देखील आहे. मंदिराचे रहस्यमय भाग, शिलालेख आणि गुंतागुंतीचे शिल्पे मंदिराला आणखी उठावदार बनवतात. दरवाजे आणि खांबांवरील कोरीवकाम देवांच्या आणि पुराणातील कथा दर्शवतात.